डोळ्यांना बर्फ लावण्याने काय फायदा होतो?

डोळ्यांवर बर्फ लावला तरी डोळ्यांनासुद्धा अनेक फायदे मिळतात. अनेक जण सकाळी डोळ्यांवर बर्फ चोळतात, असे केल्याने फुगलेले डोळे आणि डोळ्यांचा थकवा दूर होतो. जर तुम्हीही विचार करत असाल की डोळ्यांना बर्फ लावणे कितपत चांगले आहे.

डोळ्यांना बर्फ लावण्याने काय फायदा होतो?
Ice cubes applying on eyes
Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 15, 2023 | 3:04 PM

मुंबई: बर्फाचे तुकडे बहुतेक कोणतीही गोष्ट थंड करण्यासाठी वापरतात. पण तुम्ही कधी बर्फ डोळ्यांना लावलाय का? होय, चेहऱ्यावर बर्फाचे तुकडे लावण्याचे अनेक फायदे आहेत. पण डोळ्यांवर बर्फ लावला तरी डोळ्यांनासुद्धा अनेक फायदे मिळतात. अनेक जण सकाळी डोळ्यांवर बर्फ चोळतात, असे केल्याने फुगलेले डोळे आणि डोळ्यांचा थकवा दूर होतो. जर तुम्हीही विचार करत असाल की डोळ्यांना बर्फ लावणे कितपत चांगले आहे, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, डोळ्यांवर बर्फ लावल्यास अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया डोळ्यांवर बर्फ लावल्याने काय फायदा होतो?

डोळ्यांना बर्फ लावण्याचे फायदे

  1. जेव्हा आपण रात्री नीट झोपू शकत नाही, तेव्हा सकाळी आपल्या डोळ्यांना सूज आणि फुगवटा दिसतो. अशावेळी बर्फाचे 4 तुकडे डोळ्यांवर लावल्यास सूज दूर होते आणि डोळ्यांचा थकवाही दूर होतो.
  2. बर्फ लावल्याने डोळ्यांना थंडावा मिळतो, तर डोळ्यात लालसरपणा असेल तर डोळ्यात बर्फ लावल्याने ती समस्याही दूर होते. ज्या लोकांना डोळ्यात कोरडेपणा जाणवतो त्यांनी डोळ्यांवर बर्फ लावावा. यामुळे डोळ्यांच्या दुखण्यापासून आराम मिळतो. डोळ्यांखालच्या वर्तुळाची समस्या लोकांमध्ये खूप आढळून येते.
  3. परंतु जर आपण डोळ्यांभोवती बर्फ लावला तर आपल्याला नैसर्गिकरित्या डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होईल. कारण बर्फ डोळ्यांना चोळल्याने रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)