AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

benefits of raisins : अशा प्रकारे मनुके खात असाल तर होतील 4 आश्चर्यकारक फायदे

मनुका हे एक सुपरफूड आहे ज्याचे पोषक तत्व तुम्हाला अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतात. मनुके खाल्ल्याने अनेक फायदे होतात. त्यापैकी चार फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.

benefits of raisins : अशा प्रकारे मनुके खात असाल तर होतील 4 आश्चर्यकारक फायदे
shailesh musale
shailesh musale | Edited By: | Updated on: Feb 12, 2024 | 6:43 PM
Share

benefits of raisins :  निसर्गात अनेक अशा गोष्टी आहेत ज्या भरपूर स्वादिष्ट तर आहेतच पण त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहे. मनुके हे त्यापैकीच एक आहेत जे दिवसभरात कधीही तुम्ही खाऊ शकतात. मनुके हे सुपरफूड आहेत. यामध्ये अनेक पोषक तत्व आढळतात. काय आहेत त्याचे फायदे सविस्तर जाणून घेऊयात

मनुका खाण्याचे 4 फायदे कोणते?

1- मनुका हा अघुलनशील आहारातील फायबरने समृद्ध आहे. ज्यामुळे ज्यामुळे आतड्यांची हालचाल सुधारण्यास मदत होते. तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास देखील होत नाही. 100 ग्रॅम मनुक्यात 301 किलो कॅलरी ऊर्जा मिळू शकते. यामध्ये पाण्याचे प्रमाण 14.9 ग्रॅम आहे.

2- ज्या व्यक्तींना हेल्दी पद्धतीने वजन वाढवायचे आहे त्यांनी मनुक्याचे सेवन करावे. मनुक्यामुळे शरीरावरील मांस वाढण्यास मदत होते. मनुक्यात फ्रक्टोज आणि ग्लुकोज भरपूर असतात, जे तुम्हाला ऊर्जावान ठेवण्यास मदत करतात. बॅड कोलेस्ट्रॉल कमी न वाढवता मनुके वजन वाढवण्यास मदत करतात.

3- तणाव किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे जर रक्तदाबात चढ-उतार होत असेल तर अशा परिस्थितीत मनुका खाल्ल्यास तुम्हाला मदत होऊ शकते.

4- रोज काळे मनुके खाल्ल्याने तुमचे हाडे मजबूत होऊ शकतात. मनुक्यात असलेले फायटोन्यूट्रिएंट्स आणि पॉलीफेनॉल हे पोषक घटक हाडे मजबूत करण्यास मदत करतात.

5- ज्यांना डांग्या खोकल्याचा त्रास होत असेल त्यांच्यासाठी काळे मनुके हे रामबाण उपाय आहे. काळ्या मनुक्यात तापमानवाढीचा प्रभाव असतो ज्यामुळे संसर्ग कमी करून खोकला बरा होण्यास मदत होते.

Follow Us
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण... जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
Video | 'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर फडणवीसांचा राऊतांना मिश्कील टोला
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?