
भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा हा रक्षाबंधनाचा सण यंदा 19 ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. दरवर्षी हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिला आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देत असतो. रक्षा बंधनाचा हा सण खूप पुरातन असून इतिहासात देखील त्याचे अनेक दाखले पाहायला मिळतात.
पौराणिक कथामध्ये रक्षा बंधनाच्या सणाचे दाखले आढळतात,महाभारतात श्रीकृष्णाचे बोट सुदर्शन चक्रामुळे कापली गेली होती, तेव्हा द्रौपदी हीने आपला अंगावरील ओढणी फाडून भगवान कृष्णाची जखमेवर बांधली होती. त्याच वेळी श्रीकृष्णाने द्रौपदीला रक्षणाचे वचन दिले होते. त्यामुळे अध्यात्म आणि शास्रात या सणाला खूपच महत्व आहे.
जे भाऊ आणि बहीण एकत्र राहातात त्यांना व्हर्च्युअल जगाचा आधार घेण्याची गरज लागत नाही. परंतू जे भाऊ आणि बहीण एकमेकांपासून दूर रहातात त्यांना एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठविण्यासाठी सोशल मिडीयाचा आधार घ्यावा लागत असतो.या सणाच्या निमित्ताने ते एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवितात. या तुमच्यासाठी रक्षाबंधनाच्या सणाचे काही संदेश आम्ही घेऊन आलो आहोत. या शुभेच्या संदेशांना तुम्ही भावाला किंवा बहिणीला पाठवू शकता. किंवा नातेवाईकांना पाठवू शकता…