AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जंक फूडमुळे किती फॅट पोटात जातं? तुमच्या शरीराला किती फॅटीची गरज? 99 टक्के लोकांना माहिती नाही प्रमाण

निरोगी राहण्यासाठी शरीरातील फॅट योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. जास्त चरबी अनेक आजारांना आमंत्रण देते, तर चांगली चरबी ऊर्जा व जीवनसत्त्व शोषण्यास मदत करते.

जंक फूडमुळे किती फॅट पोटात जातं? तुमच्या शरीराला किती फॅटीची गरज? 99 टक्के लोकांना माहिती नाही प्रमाण
junk food
| Updated on: Dec 09, 2025 | 4:25 PM
Share

शरीरातील हाडे, पाणी, स्नायू (Muscle) आणि फॅट या सगळ्यांची बेरीज म्हणजे आपले वजन असते. आपण जेव्हा वजन कमी करतो, तेव्हा हे सगळे घटक कमी होऊ शकतात. पण, निरोगी राहण्यासाठी, आपल्याला शरीरातील फॅट म्हणजेच चरबी योग्य प्रमाणात राखणे महत्त्वाचे असते. चरबीमुळे शरीराला ऊर्जा मिळते, थंडीपासून संरक्षण होते आणि जीवनसत्त्वे शोषली जातात. पण हीच चरबी गरजेपेक्षा जास्त झाली, तर ती आरोग्यासाठी वाईट असते आणि अनेक आजारांना आमंत्रण देते.

तुमच्या शरीरासाठी आवश्यक फॅटचे प्रमाण किती?

तुमच्या एकूण कॅलरी गरजेपैकी सुमारे 20 टक्के ते 35 टक्के कॅलरी फॅटमधून मिळणे आवश्यक आहे. जर तुम्ही दररोज 2,000 कॅलरी घेत असाल, तर सुमारे 400 ते 700 कॅलरी फॅटमधून आल्या पाहिजेत. यानुसार 19 ते 50 वयोगटातील पुरुषांसाठी दररोज अंदाजे 60 ते 90 ग्रॅम फॅट असणे गरजेचे आहे. तर 19 ते 50 वयोगटातील महिलांना दररोज अंदाजे 45 ते 75 ग्रॅम फॅट आवश्यक असतात. हे प्रमाण व्यक्तीचे वय, वजन, लिंग आणि शारीरिक श्रमावर अवलंबून बदलू शकते. तर वाईट फॅट जास्त खाल्ल्यास हृदयविकार आणि लठ्ठपणा वाढवते.

हल्ली चिप्स, बर्गर आणि फ्राईज हे जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. ते चवीला चांगले असले तरी त्यामध्ये असलेले फॅट हे वाईट फॅट म्हणजे सॅचुरेटेड आणि ट्रान्स फॅट असतात. हे पदार्थ खूप तेलात तळलेले असल्याने फॅटचे प्रमाण वाढते.

पदार्थ प्रमाण एकूण फॅटचे प्रमाण (साधारण)
बर्गर (मध्यम) 1 पीस 15 ते 30 ग्रॅम
फ्रेंच फ्राईज (मध्यम) 1 वाटी 12 ते 20 ग्रॅम
पोटॅटो चिप्स छोटे पॅकेट 10 ते 15 ग्रॅम
पिझ्झा 1 स्लाइस 10 ते 15 ग्रॅम
डोनट्स 1 डोनट 12 ते 20 ग्रॅम
आइस्क्रीम 1 कप 15 ते 25 ग्रॅम
लाल मांस 100 ग्रॅम 10 ते 25 ग्रॅम
इन्स्टंट नूडल्स   1 पॅकेट 10 ते 15 ग्रॅम

वजन कमी करण्यासाठी काय करावे?

दरम्यान काही जण वजन कमी करण्याच्या नावाखाली फॅटयुक्त पदार्थ खाणे पूर्णपणे बंद करतात. तसे अजिबात करु नये. फक्त वाईट फॅट असलेले पदार्थ म्हणजेच जंक फूड, तळलेले पदार्थ खाणे कमी करा. त्याऐवजी, आहारात शेंगदाणे, बिया, चांगल्या तेलाचा समावेश करा. यामुळे तुमचे वजन आणि फॅटचे संतुलन योग्य राहील.

ही खूप मोठी बातमी, धनंजय मुंडे सरकारचा बाप... जरांगेंचा घणाघात
ही खूप मोठी बातमी, धनंजय मुंडे सरकारचा बाप... जरांगेंचा घणाघात.
परबांकडून कुणाचा भाडोत्री मंत्री असा उल्लेख? सत्ताधाऱ्यांचा गदारोळ
परबांकडून कुणाचा भाडोत्री मंत्री असा उल्लेख? सत्ताधाऱ्यांचा गदारोळ.
नाहीतर घरी बसाव लागेल, लाडक्या बहिणीवरून फडणवीसांनी भाजप आमदाराला झापल
नाहीतर घरी बसाव लागेल, लाडक्या बहिणीवरून फडणवीसांनी भाजप आमदाराला झापल.
विधान परिषदेत अनिल परब भडकले, सभागृहात एकच गदारोळ, नेमकं घडलं काय?
विधान परिषदेत अनिल परब भडकले, सभागृहात एकच गदारोळ, नेमकं घडलं काय?.
CSMT स्थानकावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार, फडणवीसांची मोठी घोषणा
CSMT स्थानकावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार, फडणवीसांची मोठी घोषणा.
तुकाराम मुंढे यांचं हे कृत्य... भाजप नेत्याच्या आरोपानं खळबळ अन्....
तुकाराम मुंढे यांचं हे कृत्य... भाजप नेत्याच्या आरोपानं खळबळ अन्.....
विधानभवन परिसर विरोधकांच्या घोषणाबाजीनं दणाणलं अन् सरकारला घेरलं
विधानभवन परिसर विरोधकांच्या घोषणाबाजीनं दणाणलं अन् सरकारला घेरलं.
त्यांची गडगंड संपत्ती, 35 वकिलांची फौज अन्...सुरेश धस काय म्हणाले?
त्यांची गडगंड संपत्ती, 35 वकिलांची फौज अन्...सुरेश धस काय म्हणाले?.
दानवेंचा 'कॅश बॉम्ब' अन विरोधकांचा सत्ताधाऱ्यावर निशाणा; एवढ्या नोटा..
दानवेंचा 'कॅश बॉम्ब' अन विरोधकांचा सत्ताधाऱ्यावर निशाणा; एवढ्या नोटा...
पालिका निवडणूक महायुती एकत्र लढणार! फडणवीस-शिंदेंमध्ये दीड तास चर्चा
पालिका निवडणूक महायुती एकत्र लढणार! फडणवीस-शिंदेंमध्ये दीड तास चर्चा.