Breast Implant : तेवीस लाख खर्च करून ‘सिलिकॉन ब्रेस्ट’ लावणे आले अंगलट ! दोन शस्त्रक्रिया करून लावले; अन् त्रास झाल्यावर पुन्हा काढून फेकले!

| Updated on: Aug 28, 2022 | 6:27 PM

Breast implant : स्तनाची वाढ न झाल्यामुळे एका महिलेचे दोनदा ब्रेस्ट इम्प्लांट करण्यात आले. यानंतर, तिच्या प्रकृतीला न मानवल्याने तिच्या तब्येतीची समस्या उद्भवली. तेव्हा, इम्प्लांट केलेले सिलिकॉन स्तन काढण्यासाठी आणखी एक शस्त्रक्रिया केली. या तीन शस्त्रक्रियांवर सुमारे 23 लाख रुपये खर्च झाले.

Breast Implant : तेवीस लाख खर्च करून ‘सिलिकॉन ब्रेस्ट’ लावणे आले अंगलट ! दोन शस्त्रक्रिया करून लावले; अन् त्रास झाल्यावर पुन्हा काढून फेकले!
तेवीस लाख खर्च करून ‘सिलिकॉन ब्रेस्ट’ लावणे आले अंगलट !
Image Credit source: Aaj Tak
Follow us on

आजच्या काळात जगभरात ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरीचा ट्रेंड खूप वाढला आहे. ब्रेस्ट इम्प्लांटला वैद्यकीय भाषेत मॅमोप्लास्टी ऑगमेंटेशन किंवा ब्रेस्ट ऑगमेंटेशन (Breast augmentation) म्हणतात. या शस्त्रक्रियेदरम्यान स्तनामध्ये सिलिकॉनचे रोपण केले जाते. 98 टक्के शस्त्रक्रिया यशस्वी होतातच परंतु फक्त एक किंवा दोन टक्के प्रकरणांमध्ये अडचणी येऊ शकतात. संशोधनानुसार, यूएसमधील प्रत्येक 1000 महिलांपैकी 8.08 महिलांना स्तन प्रत्यारोपण (Breast implants) होत आहे. नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यात एका महिलेने वयाच्या 35 व्या वर्षी दुसऱ्या गर्भधारणेनंतर ब्रेस्ट इम्प्लांट केले होते. पण तिची अवस्था अशी झाली की, तिने इम्प्लांट काढले आणि आता ती बरी आहे. जाणून घ्या, या महिलेच्या सिलिकॉन इम्प्लांट (Silicone implants) अर्थात कृत्रिम स्तन रोपणाचे कारण काय होते.

कोण आहे ही महिला?

वयाच्या 35 व्या वर्षी कृत्रीम स्तन रोपण करणाऱ्या (ब्रेस्ट इम्प्लांट) करणाऱ्या महिलेचे नाव डार्सी डेव्हिस-अॅलसॉप असून ती अमेरिकेची आहे. वयाच्या 35 व्या वर्षी तिने ब्रेस्ट इम्प्लांट करायचं ठरवलं. वास्तविक, दुसऱ्या गर्भधारणेनंतर, तिच्या स्तनाचा आकार सामान्यपेक्षा खूपच कमी होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

23 लाखांचा खर्च

इनसाइडरच्या मते, डार्सीवर जवळपास तीन शस्त्रक्रिया झाल्या. नऊ वर्षे सलाईन इम्प्लांट आणि 3 वर्षे सिलिकॉन इम्प्लांट ठेवल्यानंतर तब्बल 13 वर्षांनी त्यांनी ब्रेस्ट इम्प्लांट काढले. सर्व तीन शस्त्रक्रियांचा खर्च सुमारे 2.3 दशलक्ष ($30,000) आहे.

हे सुद्धा वाचा

तीन शस्त्रक्रिया झाल्या

डार्सी डेव्हिसच्या म्हणण्यानुसार, तिच्यावर तीन स्तनांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. प्रथम त्याला सलाईन इम्प्लांट (Saline implants) केले, ज्यामध्ये खारट पाणी आत भरले जाते. त्यानंतर नऊ वर्षांनी त्यांनी सेलीनच्या जागी 210 सीसी सिलिकॉन टाकले. त्यानंतर 3-4 वर्षांनी शस्त्रक्रिया करून सिलिकॉन इम्प्लांटही काढले.

स्तनरोपण (ब्रेस्ट इम्प्लांट) रोगामुळे होणारे नुकसान

डार्सी डेव्हिसच्या म्हणण्यानुसार, ब्रेस्ट इम्प्लांटनंतर तिला तिच्या सांध्यांमध्ये वेदना, प्रचंड थकवा आणि तीव्र डोकेदुखी सुरू झाली. यानंतर 2020 मध्ये तिने यावर अनेक उपचार केले आणि नंतर तिच्या एका मैत्रिणीने सांगितले की, हे कृत्रिम स्तन रोपण (ब्रेस्ट इम्प्लांट साईड इफेक्ट) दुष्परिणाम असू शकतात. तिलाही तसंच वाटत असलं तरी तिने मुद्दाम स्वतःच्या शरीरात विष ओतलं होतं आता जे, तिच्या जिवावर उठले, असा पश्चात्ताप तिला करायचा नव्हता.

यानंतर, डार्सी अनेक ऑनलाइन फोरममध्ये सामील झाली आणि ब्रेस्ट इम्प्लांटेशनमुळे होणाऱ्या आजारांवर संशोधन करू लागली. तिला त्यामुळे, शरीरात जवळपास 15 दुष्परिणाम दिसत होते. मग काय, ती स्तनातून सिलिकॉन काढण्यासाठी चांगला सर्जन शोधू लागली आणि 6 महिन्यांनी तिच्यावर शस्त्रक्रिया झाली. बरे झाल्यानंतरही छातीवर शस्त्रक्रियेचे चट्टे स्पष्टपणे दिसत असल्याचे तिने सांगितले.