
आपण कपडे ओलसर किंवा नीट न वाळवता ठेवले तर त्यात किडे आणि बुरशी वाढण्याची शक्यता जास्त असते. तसेच घामाचे, अन्नाचे डाग किंवा घाण असलेले कपडे थेट कपाटात ठेवल्यास त्याकडे कृमी आकर्षित होतात. याशिवाय कपाटात हवा खेळती नसल्यास, अंधार आणि दमट वातावरण असल्यास कृमी वाढतात. कपडे बराच काळ न वापरता तसेच ठेवले तर त्यात पतंग आणि कृमी लागतात. कृमींपासून वाचवण्यासाठी कापूर गोळ्या वापरल्या जातात.
कापूर गोळ्यांचा फायदे :
कापूर गोळ्यांचा फायदा असा की त्या कपड्यांना लागणाऱ्या कृमी, पतंग आणि लहान कीटक दूर ठेवण्यास मदत करतात. या गोळ्यांचा वास कृमींना सहन होत नाही, त्यामुळे कपाटात ठेवलेले कपडे सुरक्षित राहतात. दीर्घकाळ साठवून ठेवलेल्या लोकरी, रेशमी किंवा महागड्या कपड्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. तसेच कपाट, पेटी किंवा साठवणुकीच्या जागेत दुर्गंधी कमी करण्यासही या गोळ्या मदत करतात.
कापूर गोळ्या कुठे-कुठे वापरल्या जातात?:-
कापूर गोळ्या यांचा वापर घरगुती कारणांसाठी केला जातो. या गोळ्या प्रामुख्याने कपाटात, पेटीत किंवा कपड्यांमध्ये ठेवल्या जातात, ज्यामुळे कपड्यांना कीड, पतंग आणि कृमी लागत नाही. कापूर गोळ्याच्या वासामुळे किडे दूर राहतात आणि कपडे सुरक्षित राहतात.
याशिवाय या गोळ्यांचा वापर काही ठिकाणी बाथरूम किंवा साठवणुकीच्या जागेत दुर्गंधी कमी करण्यासाठीही केला जातो. मात्र कापूर गोळ्या थेट हाताळताना काळजी घ्यावी, त्या खाण्यासाठी नसतात आणि लहान मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवाव्यात.
कापूर गोळ्यांचा उपयोग कसा केला पाहिजे:
कापूर गोळ्यांचा उपयोग योग्य पद्धतीने केला तर तो सुरक्षित आणि उपयोगी ठरतो. कापूर गोळ्या प्रामुख्याने कपाटात किंवा कपड्यांच्या पेटीत ठेवतात. त्या थेट कपड्यांवर न ठेवता कागदात किंवा कापडात गुंडाळून ठेवाव्यात, त्यामुळे कपड्यांना डाग पडत नाहीत आणि वासही जास्त लागत नाही. पूजा करताना कापूर जाळण्यासाठीही त्याचा वापर केला जातो. मात्र कापूर गोळ्या खाण्यासाठी नसतात. बंद, कमी हवेशीर जागेत जास्त प्रमाणात वापर टाळावा. योग्य प्रमाणात आणि काळजीपूर्वक वापर केल्यास कापूर गोळ्या सुरक्षित आणि फायदेशीर ठरतात.
त्याच प्रमाणे कापूरच्या गोळ्या पूर्णपणे सुरक्षित नाहीत, विशेषतः चुकीच्या पद्धतीने वापरल्यास. कापूरचा तीव्र वास सतत श्वासातून गेल्यास डोकेदुखी, चक्कर, मळमळ होऊ शकते. बंद कपाटात किंवा कमी हवेशीर खोलीत जास्त प्रमाणात कापूर ठेवल्यास श्वसनास त्रास होण्याची शक्यता असते.
लहान मुले चुकून कापूरच्या गोळ्या तोंडात घालू शकतात, जे अत्यंत धोकादायक आहे. तसेच काही लोकांना कापूरमुळे अॅलर्जी किंवा त्वचेवर जळजळ होऊ शकते. म्हणून कापूरच्या गोळ्या मर्यादित प्रमाणात, कागदात गुंडाळून, आणि नेहमी मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवाव्यात. सुरक्षित वापर केल्यास धोका कमी होतो, पण अति वापर टाळणे आवश्यक आहे.