रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मोसंबीचा रस अत्यंत फायदेशीर !

| Updated on: May 20, 2021 | 5:14 PM

सध्याच्या कोरोना काळात आरोग्याची विशेष काळजी घेतले पाहिजे. त्यामध्येही आपण आहारात व्हिटॅमिन सी जास्त घेतले पाहिजे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मोसंबीचा रस अत्यंत फायदेशीर !
किवीचा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असतो. किवीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक असतात. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. यामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होते. त्वचेची कांती सुधारते.
Follow us on

मुंबई : सध्याच्या कोरोना काळात आरोग्याची विशेष काळजी घेतले पाहिजे. त्यामध्येही आपण आहारात व्हिटॅमिन सी जास्त घेतले पाहिजे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. काही असे फळ आहेत ज्याचा रस आपण दररोज सकाळी पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. मोसंबीच्या रसात व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम असते. मोसंबी उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्याचे काम करते. (Citrus juice is beneficial for boosting the immune system)

मोसंबीचा रस आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मोसंबीचा रस घेतल्याने पित्ताच्या समस्येवर मात करता येते. मोसंबीच्या रसात व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम असते. हे शरीर ऊर्जावान ठेवते. मोसंबीचा रस घेतल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. मोसंबीमध्ये पोटॅशियम असते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. तसेच यामुळे पाचन तंत्र निरोगी राहते. मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी पर्याप्त प्रमाणात आढळते, जे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास आणि रोगांशी लढायला मदत करते.

उन्हाळ्यात मोसंबीचे खाणे चांगले मानले जाते. आता सध्याच्या काळात तर अनेक वेळा डाॅक्टर रोग प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी मोसंबीचे खाण्याचा सल्ला देखील देतात. आवळा आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी जेवढा फायदेशीर आहे त्यापेक्षाही अधिक आवळा रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. यात व्हिटामिन बी 5, व्हिटामिन बी 6, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम समृद्ध प्रमाणात आढळते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट असतात.

आरोग्याच्या बाबतीत लसूणचे बरेच फायदे आहेत. लसूणच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच सर्दी, सौम्य खोकला, गॅस, आम्लपित्त, सांधेदुखीसारख्या सर्व त्रासांतून आराम मिळतो. जेवण बनवताना त्यात लसूण घातल्यास पदार्थाची चव अनेक पटींनी वाढते. शरीर निरोगी ठेवण्यासाठीही लसूण खूप फायदेशीर मानली जाते. पेरू हा व्हिटॅमिन सीचा मोठा स्त्रोत आहे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह देखील भरपूर प्रमाणात असते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weather change sickness । बदलत्या हवामानात चुकूनही करु नका या 5 चुका, आजारी पडाल

एकदा उकळवलेले दूध पुन्हा उकळवण्याची चूक करताय? होऊ शकते मोठे नुकसान!

(Citrus juice is beneficial for boosting the immune system)