एअर फ्रायरमध्ये स्वयंपाक करण आरोग्यासाठी चांगलं की धोक्याचं? तज्ज्ञ काय सांगतात!
आज पाहायला गेलं तर, बाजारात अनेक प्रकारचे उपकरणं उपलब्ध आहेत. ज्यांचा वापर आपण रोज करतो. पण आपण वापत असलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे का, याबद्दल फार कोणाला माहिती नसतं. तसंच एअर फ्रायरबद्दल देखील आहे. तर जाणून घ्या एअर फ्रायर आपल्या आरोग्यासाठी योग्य आहे का?

जूनमध्ये स्वयंपाकाच्या गॅसचे दर गगनाला भिडल्याने, बंगाली लोक आपला खर्च कमी करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधत आहेत. गॅस वाचवण्यासाठी घरांमध्ये इंडक्शन किंवा मायक्रोवेव्हचा वापर वाढत आहे एवढंच नाही तर, त्यासोबतच एअर फ्रायरही स्वयंपाकघरात आपलं स्थान निर्माण करत आहेत. बऱ्याच लोकांना वाटतं की हे आधुनिक उपकरण दैनंदिन जीवनातील अडचणींपासून दिलासा देऊ शकतं. पण ते आरोग्यासाठी खरंच लाभदायक आहे का? याबद्दल कोणाला माहिती नसेल.
आरोग्याबद्दल जागरूक असलेले लोक तेलाशिवाय कुरकुरीत पदार्थ बनवता येतील या विचाराने एअर फ्रायरकडे वळत आहेत. पण त्यात शिजवलेले पदार्थ आपल्या शरीरासाठी खरोखरच फायदेशीर आहेत का? तज्ज्ञांच्या मते, एअर फ्रायर आरोग्यासाठी पूर्णपणे बरोबर नाही.
एअर फ्रायर प्रामुख्याने नाश्ता किंवा तळलेले पदार्थ बनवण्यासाठी वापरलं जातं. या विद्युत उपकरणाने रोजचा स्वयंपाक करणं जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे, दररोज आरोग्यदायी आणि पोटभर जेवण बनवण्याऐवजी याला पर्याय समजणं ही एक मोठी चूक ठरेल.
अनेकांना तेलात बुडवून तळलेले पदार्थ खायला खूप आवडतात, जे या मशीनमध्ये शक्य होत नाही. एअर फ्रायरमध्ये ती सुविधा नसल्यामुळे, बरेच लोक तळण्यापूर्वी कच्च्या पदार्थांना भरपूर तेल लावतात. नंतर, तेल लावलेला कच्चा पदार्थ मशीनमध्ये ठेवून तळला जातो.
एअर फ्रायरमध्ये तेलात अन्न तळणं हे शरीरासाठी आणि आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं . विश्लेषकांच्या मते, ही पद्धत जवळपास डीप फ्रायिंगसारखीच आहे. परिणामी, ज्या मूळ उद्देशाने हे उपकरण खरेदी केलं जातं. तो उद्देशच पूर्णपणे निष्फळ ठरतो. तुम्हाला एअर फ्रायर वापरायचा असेल तर, तुम्ही त्यामध्ये तेल न वापरता पदार्थ तळू शकतात. मात्र, पदार्थाची चव नेहमीच्या फ्रायरइतकी स्वादिष्ट नसते. त्यामुळे, चव आणि आरोग्य यांच्यात योग्य संतुलन राखण एक मोठे आव्हान आहे.
एअर फ्रायरच्या मदतीने स्वयंपाक लवकर होत असलं तरी, काम झाल्यावर त्याला स्वच्छ करणं ग्राहकासाठी खूप त्रासदायक ठरतं. उत्तम आरोग्य राखण्यासाठी कमी तेल आणि चांगल्या प्रतीचे तेल वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. त्यामुळे, एअर फ्रायर वापरण्यापूर्वी त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही लक्षात ठेवलं पाहिजेत.