पाणी पिण्यासाठी व आरोग्यासाठी स्टीलची की काचेची बाटली सर्वोत्तम, जाणून घ्या तज्ञ काय म्हणतात?

जर तुम्हीही पाणी पिण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बाटल्या वापरत असाल तर कोणती बाटली तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. याबद्दल तज्ञ काय म्हणतात ते आपण आजच्या या लेखात जाणून घ्या.

पाणी पिण्यासाठी व आरोग्यासाठी स्टीलची की काचेची बाटली सर्वोत्तम, जाणून घ्या तज्ञ काय म्हणतात?
water bottle
| Edited By: | Updated on: Jun 01, 2025 | 4:21 PM

उन्हाळ्यात हायड्रेटेड राहणे सर्वात महत्वाचे आहे. यासाठी आपण शक्य तितके पाणी पितो. त्यातच प्रत्येकजण उन्हाळयात थंड पाणी पिण्यासाठी फ्रिजमध्ये पाण्याच्या बाटल्या भरून ठेवतो. घरी असो वा बाहेर पाणी पिण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बाटल्या वापरत असतो, पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही ज्या बाटलीतून पाणी पिता त्याचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होतो. आजच्या काळात पाण्याची बाटली आपल्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग बनली आहे. अशा परिस्थितीत, योग्य बाटली वापरणे खूप महत्वाचे आहे. तर आजच्या या लेखात आपण याबद्दल तज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊयात

तज्ञांचे मत

ऑर्थोपेडिक सर्जन आणि आरोग्य तज्ज्ञ यांनी सामान्य घरगुती पाण्याच्या बाटल्यांची क्रमवारी सांगितली आहे. आपल्यापैकी बहुतेकजण कोणत्या प्रकारच्या पाण्याच्या बाटल्या वापरतात आणि त्यांचा आरोग्यावर होणारा परिणाम याबद्दल माहित असणे आवश्यक आहे.

स्टील बाटली

सर्वोत्तम स्टेनलेस स्टीलच्या बाटल्या टिकाऊ, नॉन रिॲक्टिव नसलेल्या आणि BPA किंवा phthalates सारख्या हानिकारक केमिकलपासून मुक्त असतात. तुम्ही त्यात थंड पाणी किंवा गरम चहा ठेवला तरी ते त्यातील घटक योग्यरित्या राखते. यासाठी तुमच्या रोजच्या वापरात स्टीलची पाण्याची बाटली वापरण्यास डॉक्टर याला एक चांगला पर्याय मानतात.

काचेची बाटली

काचेच्या बाटल्या केमिकलच्या धोक्याशिवाय पाणी स्वच्छ आणि शुद्ध ठेवतात. आजच्या काळात, लोकांना ही बाटली लवकर फूटते त्यामुळे ती ठेवणे आवडत नाही, परंतु या बाटलीत पाणी प्यायल्याने तुम्ही आजारी पडत नाही आणि त्यामुळे तुमच्या आरोग्याला कोणतेही नुकसान होत नाही.

तांब्याची बाटली

आयुर्वेदावर विश्वास ठेवणारे लोकं फक्त तांब्याच्या बाटल्यांमध्ये पाणी पिणे पसंत करतात. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि दाहक-विरोधी फायदे प्रदान करते. असे मानले जाते की रात्रभर तांब्याच्या बाटलीत पाणी ठेवल्याने त्यात लोह वाढते, जे शरीरासाठी खूप आवश्यक आहे. त्यामुळे ही एक चांगली बाटली ठरू शकते.

सिपर बाटली

सिपर बाटली व्यायामासाठी अनुकूल आहे. बहुतेक लोकांना ते जिममध्ये घेऊन जायला आवडते. पण जर ते व्यवस्थित स्वच्छ केले नाहीत तर ते बॅक्टेरियाची पैदास करू शकतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही या बाटलीत पाणी प्यायले तर आजाराचा धोका वाढू शकतो.

प्लास्टिक बाटली

जुन्या मिनरल वॉटर बाटल्या पाणी भरून ठेवणे किफायतशीर वाटू शकतात, परंतु कालांतराने त्या खराब होतात आणि तुमच्या पाण्यात मायक्रोप्लास्टिक आणि संभाव्य हानिकारक रसायने सोडतात. हे एकदा वापरता येणारे प्लास्टिक कधीही वारंवार वापरण्यासाठी बनवले जात नाही, म्हणून अशा बाटल्या वापरणे टाळा.

प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी पिण्याचे तोटे

प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये BPA (Bisphenol-A) किंवा इतर हानिकारक रसायने असू शकतात. त्यामुळे आजारांचा धोका वाढतो. ही रसायने उष्णतेमध्ये पाण्यात विरघळू शकतात. अशा परिस्थितीत त्यात पाणी प्यायल्याने हार्मोनल असंतुलन, थायरॉईड आणि प्रजनन समस्या उद्भवू शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)