दिवाळीच्या फराळात यंदा करा थोडा बदल; नेहमीच्या बेसन लाडू ऐवजी बनवा मोतीचूर लाडू, पाहा सोपी रेसिपी

Diwali Sweets Recipe : बहुतांश घरी दिवाळीच्या फराळात बेसनाचा लाडू बनवला जातो. पण तुम्हाला यंदा बेसन लाडू खायचा नसेल तर तुम्ही सोप्या पद्धतीने मोतीचूर लाडू बनवू शकता. येथे जाणून घ्या रेसिपी.

दिवाळीच्या फराळात यंदा करा थोडा बदल; नेहमीच्या बेसन लाडू ऐवजी बनवा मोतीचूर लाडू, पाहा सोपी रेसिपी
Motichur ladu
| Edited By: | Updated on: Nov 04, 2026 | 9:49 PM

दिवाळीचा फराळ म्हटला की चिवडा, चकलीसोबतच लाडूची आठवण सर्वात आधी येते. दरवर्षी दिवाळीत बेसन लाडू बनवले जातात, पण यंदा नेहमीच्या बेसन लाडूंऐवजी काहीतरी वेगळं करून पाहायचं असेल तर मोतीचूर लाडू हा उत्तम पर्याय ठरू शकतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नैवेद्यासाठीही तुम्ही हे लाडू बनवू शकता. बाजारातील मिठाई खाणे टाळत असाल, तर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मोतीचूर लाडू तयार करता येतील. विशेष म्हणजे, योग्य साहित्य आणि कृतीचा वापर केल्यास बाजारात मिळतात तसे चविष्ट आणि मऊ मोतीचूर लाडू बनवता येतात. चला तर मग, जाणून घेऊया मोतीचूर लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.

मोतीचूर लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात बेसन घ्या. आता त्यात पिवळा किंवा केशरी रंग टाका. नंतर त्यात पाणी घाला आणि ते चांगले मिक्स करा. लक्षात ठेवा की त्यात एकही गुठळी राहू नये. शेवटी दोन चिमूटभर बेकिंग पावडर घाला. आता कढईत तूप टाका आणि बुंदीचे पीठ हळूहळू तुपात ओतत रहा. यासाठी तुम्हाला बारीक छिद्र असलेला साचा वापरावा लागेल. तुम्ही यासाठी झाऱ्याचा सुद्धा वापर करू शकता.

Loading...

काही ठिकाणी बुंदी तळण्यासाठी तेलाचा वापर केला जातो. पण या रेसिपीमध्ये आम्ही तुम्हाला देशी तुपात बुंदी तळण्याचे सांगत आहोत. बुंदी तळून झाल्यावर बाजूला ठेवा. आता एका पातेल्यात दोन तारांचे पाक बनवा. त्यात वेलची पूड आणि खसखस घाला. आता हे पाक बुंदीमध्ये मिसळून लाडू बनवा. तुमचे लाडू तयार आहेत. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यात ड्राय फ्रूट्स देखील घालू शकता.

मोतीचूर लाडू बनवण्यासाठी आवश्यक साहित्य
– बेसन
– ऑरेंज किंवा पिवळ्या कलर
– साखर
– खसखस
– बेकिंग पावडर
– वेलची पावडर
– देशी तूप

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us