Diwali Hair Care: दिवाळीत फक्त चेहऱ्याचीच नाही, तर केसांचीही वाढवा सुंदरता! ट्राय करा हे 3 घरगुती उपाय
Home Remedies for Healthy Hair: दिवाळीत सुंदर दिसण्यासाठी महिला त्वचेची विशेष काळजी घेतात, मात्र केसांकडे दुर्लक्ष करतात. अशा वेळी केस मुलायम, निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. जाणून घेऊया दिवाळीपूर्वी केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी कोणते 3 सोपे उपाय करता येतील.

दिवाळीचा सण जवळ आला की, प्रत्येक जण सुंदर दिसण्यासाठी त्वचेची विशेष काळजी घेतो. मात्र, त्वचेप्रमाणेच केसांचीही तितकीच काळजी घेणं गरजेचं असतं. केसांच्या समस्या दूर करण्यासाठी आणि त्यांना स्वच्छ व चमकदार ठेवण्यासाठी बाजारात अनेक प्रोडक्ट्स मिळतात. शॅम्पू आणि कंडिशनरचाही नियमित वापर केला जातो. मात्र, काही प्रोडक्ट्समधील रसायनांमुळे केसांची मुळं कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे केस गळणे, कोंडा होणे आणि केस कोरडे पडणे अशा समस्या निर्माण होतात. अशा वेळी दिवाळीपूर्वी केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी आणि त्यांना मुलायम व चमकदार बनवण्यासाठी काही घरगुती उपाय करता येऊ शकतात. चला तर जाणून घेऊया हेल्दी केसांसाठी 3 सोपे घरगुती उपाय.
असे बनवा जवसाचे जेल
जर तुम्हाला केसांसाठी घरी फ्लेक्स सीड जेल बनवायचे असेल तर अर्धा कप फ्लेक्स सीड म्हणजे जवसाच्या बिया घ्या. त्यात २ कप पाणी आणि १-२ टेबलस्पून लिंबाचा रस मिक्स करा. आता एका भांड्यात पाणी आणि जवस घट्ट होईपर्यंत उकळा. त्यात लिंबाचा रस घालून मिक्स करा. जेव्हा ते घट्ट जेलसारखे दिसू लागते तेव्हा गॅस बंद करा. जेल सारखी कंसिस्टंसी येईपर्यंत थंड होऊ द्या. ते थंड झाल्यावर वापरण्यासाठी हे जेल एका कंटेनरमध्ये भरून ठेवा. हे जवसाचे हेअर जेल रोज सकाळी केसांना लावा.
मध लावा
मध केसांसाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी मध आणि पाणी समप्रमाणात घेऊन एका भांड्यात टाका आणि मिक्स करा. आता हे मिश्रण केसांना लावा. साधारण २० ते ३० मिनिटे केसांवर राहू द्या. नंतर केस साध्या पाण्याने धुवा. यामुळे स्प्लिट एंड्स, फ्रिजी केसांची समस्या दूर होईल.
एलोवेरा जेल
त्वचा आणि केस दोन्हीसाठी एलोवेरा जेल खूप फायदेशीर आहे. केसांच्या समस्या दूर करण्यासाठी थोडेसे एलोवेरा जेल हातात घ्या आणि केसांना पूर्णपणे लावा. केसांच्या मुळापासून ते टोकापर्यंत हे नीट लावून घ्या. साधारण २० ते २५ मिनिटे हे केसांवर राहू द्या. नंतर पाण्याने धुवा. केस मऊ, चमकदार आणि मजबूत करण्यासाठी आठवड्यातून एकदा वापरा. एलोवेरा जेलने केसांच्या अनेक समस्या दूर होतात.