Laxmikant Berde : ‘सर्वांसमोर तू माझी इज्जतच काढलीस…’, खास मित्रावर का संतापलेले लक्ष्मीकांत बेर्डे? ‘ती’ हाक अन्…
Laxmikant Berde : 'ती' कोणती हाक होती, ज्यामुळे खास मित्रावर भडकलेले लक्ष्मीकांत बेर्डे आणि संतापात म्हणालेले, 'सर्वांसमोर तू माझी इज्जतच काढलीस...', फार कमी लोकांना माहिती आहे हा किस्सा, जाणून घ्या तेव्हा नेमकं काय झालेलं.

Laxmikant Berde : “मी आलो.. मी पाहिलं.. मी लढलो.. मी जिंकून घेतलं सारं”, खरंच दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी फार लवकर मराठी सिनेविश्वाची साथ सोडली. ‘टूर टूर’ या नाटकातून सुरु झालेला त्यांचा प्रवास मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचला आणि लक्ष्मीकांत बेंर्डे यांनी मराठी सिनेविश्वावर आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. धूमधडाका, गडबड घोटाळा,दे दणादण, अशी ही बनवाबनवी, धडाकेबाज, आयत्या घरात घरोबा… यांसारख्या असंख्य सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. ‘धनंजयन माने इथेच राहतात का?’, हा त्यांचा डायलॉग तर कोणी विसरूच शकत नाही… लक्ष्मीकांत यांच्या असंख्य आठवणी आजही चाहत्यांच्या मनात कायम आहेत. तर लक्ष्मीकांत यांचे जवळचे मित्र देखील त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांबद्दल सागंत असतात.
सर्वांना माहिती आहे की, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांच्यासोबत खास मैत्री होती, पण अभिनेते चेतन दळवी यांच्यासोबत देखील लक्ष्मीकांत यांची खास मैत्री होती. चेतन दळवी यांनी एका मुलाखतीत त्यांच्या मैत्रीचा एक किस्सा सांगितला. चेतन दळवी यांनी सर्वांसमोर लक्ष्मीकांत बेर्डे यांना त्यांच्या टोपन नावाने हाक मारली, तेव्हा ते चेतन दळवी यांना म्हणालेले, ‘तू तर माझी इज्जत काढलीस यार…’, तर जाणून घ्या तेव्हा नेमकं काय झालेलं.
सांगायचं झालं तर, चेतन दळवी कायम लक्ष्मीकांत बेर्डे यांना टोपन नावाने हाक मारायचे. दळवी म्हणालेले, ‘घरी सगळे लक्ष्मीकांत बेर्डे यांना गोट्या म्हणायचे. मी देखील त्याला गोट्याच म्हणायचो… कोल्हापूरचा किस्सा आहे हा, त्यानंतर मी त्याला गोट्या नावाने हाक मारणंच बंद केलं… कारण मोठा स्टार आहे, असं म्हणणं बरं वाटत नाही…’
पुढे चेतन दळवी म्हणाले, ‘मी मेकअप करुन आलेलो आणि मी म्हटलं, जा बोलवत आहे सगळे… गोट्या त्याचं पेटनेम होतं. तेव्हा सर्वांसमोर मी त्याला गोट्या म्हणालो. त्यानंतर तो माझ्याकडे आला आणि म्हणला, ‘इथे पण माती केलीस, इथे माझी इज्जत काढलीस मी काय म्हटलं काय केलं? गोट्या काय त्यांच्यासमोर?’ मी पण त्याला सॉरी सॉरी म्हणालो. यावर तो मला म्हणाला, ‘असंच कर आणि सॉरी बोल…’ त्यानंतर मी कधीच त्याला गोट्या म्हणालो नाही…’, हा किस्सा चेतन दळवी यांनी एका मुलाखतीत सांगितलेला.
