Poisonous Fish: ‘हे’ मासे खात असाल तर सावधान, शरीरात करतात विषासारखं काम

Poisonous Fish: वेगवेगळ्या प्रकारचे मासे खायला अनेकांना आवडतं. पण काही मासे असे देखील आहेत. जे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शतात. काही मासे असे देखील आहेत, जे शरीरात विषासारखं काम करतात... तर 'ते' कोणते मासे आहेत जाणून घ्या...

Poisonous Fish: 'हे' मासे खात असाल तर सावधान,  शरीरात करतात विषासारखं काम
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 2:22 PM

Poisonous Fish: फक्त भारतात नाही तर, अनेक ठिकाणी मासे खाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. परदेशात तर मासे खाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. मासे खायला अनेकांना आवडतं. पण आज अशा काही माशांबद्दल जाणून घेऊ जे शरीरात विषासारखं काम करतात. गरोदर, स्तनपान करणा-या स्त्रिया किंवा माता बनण्याची योजना आखत असलेल्या महिलांनी हे मासे खाणे टाळावे. कारण त्यात विषारी पदार्थ असतात ज्यामुळे गर्भ, अर्भक आणि बालकांच्या मज्जासंस्थेच्या विकासात समस्या निर्माण होतात.

मोठा मांगूर मासा : बाजारात गेलात तरी मोठ्या आकाराचे मांगूर मासे खरेदी करण टाळा. लहान आकाराचा मासे खाण्यास काहीही हरकत नाही. कारण माशाचा आकार झपाट्याने वाढवण्यासाठी काही वेळा अनेक प्रकारचे हार्मोन्स त्याच्या शरीरात टोचले जातात, जे आपल्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. हे धोकादायक रसायने आहेत. रसायनाने शरीरात प्रवेश केल्यानंतर नुकसान करतात. यामुळे तुम्हाला गंभीर आजारही होऊ शकतात.

बांगडा : अनेकांना बांगडा मासे खायला आवडतात. पण बांगड्यामध्ये पारा असतो… हे फार कमी लोकांना माहिती आहे. जर तुम्ही बांगडा खात असाल, तर तुमच्या पोटात पारा जमा होईल. यामुळे अनेक धोकादायक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही देखील बांगडा मासा खात असाल, तर आज पासून मासा खाणं टाळा…

हे सुद्धा वाचा

टूना फिश : टूना फिश हा खाऱ्या पाण्यातील मोठा मासा आहे. टूना मासा परदेशी मासा आहे. त्यात पाराही मोठ्या प्रमाणात असतो. माशांना मोठ्या प्रमाणात हार्मोन्स आणि अँटीबायोटिक्सचे इंजेक्शन दिले जाते, जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. हा मासा संपूर्ण देशात मोठ्या आवडीने खाल्ला जातो, परंतु गर्भवती महिलांनी तो खाणे ताबडतोब बंद करावं.

तिलापिया मासे : तिलापियामध्ये मोठ्या प्रमाणात हानिकारक चरबी असते, ज्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. ज्यामुळे हृदयविकार आणि इतर आजार होऊ शकतात. याशिवाय दमा किंवा संधिवात असेल तर तुम्ही तिलापिया मासे खाणं टाळा. कोणतेही मासे खाण्याआधी मासे आरोग्यास किती घातक आहेत जाणून घ्या..

Non Stop LIVE Update
अररर बाबा...कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट; विद्यार्थी पास, प्रशासन नापास
अररर बाबा...कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट; विद्यार्थी पास, प्रशासन नापास.
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी.
देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' गंभीर आरोपावर शरद पवार गटाचा पलटवार
देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' गंभीर आरोपावर शरद पवार गटाचा पलटवार.
जागावाटपावरून महायुतीत वाद; कदम संतापले, सर्वांना संपवून भाजपला फक्त..
जागावाटपावरून महायुतीत वाद; कदम संतापले, सर्वांना संपवून भाजपला फक्त...
पवार कुटुंब एकाच मंचावर..ताई दादांनी एकमेकांशी बोलणं काय बघणं पण टाळलं
पवार कुटुंब एकाच मंचावर..ताई दादांनी एकमेकांशी बोलणं काय बघणं पण टाळलं.
मविआची ४२ जागांची यादी TV9 कडे... जागा वाटपावर एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट
मविआची ४२ जागांची यादी TV9 कडे... जागा वाटपावर एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट.
video | उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू नेत्याला समन्स, काय प्रकरण
video | उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू नेत्याला समन्स, काय प्रकरण.
Loksabha | महाविकास आघाडीचे 48 पैकी 42 उमेदवार जवळपास ठरले
Loksabha | महाविकास आघाडीचे 48 पैकी 42 उमेदवार जवळपास ठरले.
अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवणारा मास्टरमाईंड कोण? अनिल देशमुख म्हणाले
अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवणारा मास्टरमाईंड कोण? अनिल देशमुख म्हणाले.
इलेक्शन कमिशन हे मोदी-शाह कमिशन बनले, संजय राऊत यांची जोरदार टीका
इलेक्शन कमिशन हे मोदी-शाह कमिशन बनले, संजय राऊत यांची जोरदार टीका.