AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका ‘ही’ फळं, चव आणि पोषण दोन्ही होईल खराब

बऱ्याचदा आपण फळे ताजी आणि काही दिवस चांगली राहावी यासाठी थेट फ्रिजमध्ये ठेवतो. ही सवय सामान्य आहे आणि सुरक्षित वाटते, पण तुम्हाला माहिती आहे का की काही फळे फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांची चव, पोत आणि पोषक तत्वे खराब होऊ शकतात? चला जाणून घेऊया कोणती फळे फ्रिजमध्ये ठेवू नयेत.

चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका 'ही' फळं, चव आणि पोषण दोन्ही होईल खराब
फळांचे पोषणImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Jun 21, 2025 | 2:34 PM
Share

आपण प्रत्येकजण चांगले आरोग्य राहावे यासाठी आहारात फळांचे सेवन करत असतो. तसेच आरोग्याच्या दृष्टीने फळांचे सेवन अत्यंत महत्वाचे आहे. कारण फळांमध्ये असणारे जीवनसत्वे, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्वे आपल्या शरीराला सशक्त ठेवण्याचे काम करतात. ज्यामुळे आपण बाराही महिने घरांमध्ये फळ आणून ठेवतो. अशातच आपण कोणताही पदार्थ, पालेभाज्या आणि फळं जास्त दिवस चांगले राहावे व फ्रेश राहावे यासाठी फ्रिजमध्ये स्टोअर करतो पण काही फळं फ्रिजमध्ये ठेवल्याने खराब होतात. तर काही फळांमधील पोषक तत्वे कमी होतात, तुम्ही जर फ्रिजमध्ये ठेवलेल्या फळांचे सेवन केले तर ते तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतात. यासाठी आपल्या आरोग्यासाठी कोणती फळे फ्रिजमध्ये ठेऊ नये हे आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात…

1. सफरचंद फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांचा वरील पोत हळूहळू मऊ होतो. तसेच थंड तापमानामुळे सफरचंदामधील नैसर्गिक गोडवा आणि चवीवरही परिणाम होतो. जर सफरचंद पूर्णपणे पिकलेले नसतील तर ते खोलीच्या तपमानावर ठेवणे चांगले जेणेकरून ते हळूहळू पिकू शकतील.

2. उष्ण हवामानात पिकणारा आंबा फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांचा सुगंध आणि गोडवा दोन्ही कमी होतो. विशेषतः कच्चे किंवा अर्धपिकलेले आंबे फ्रिजमध्ये ठेवल्याने ते पूर्णपणे पिकू शकत नाहीत आणि त्यांची चव खराब होते. आंबे पूर्णपणे पिकेपर्यंत खोलीच्या तापमानावर ठेवावेत.

3. अननस कापण्यापूर्वी फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याची नैसर्गिक चव आणि रस कमी होऊ शकतो. फ्रिजच्या थंड वातावरणात अननसाचा पोत देखील स्पंजी आणि आंबट होऊ शकतो. अननस नेहमी खोलीच्या तापमानावर पिकू द्या आणि कापल्यानंतर थोड्या वेळासाठीच फ्रिजमध्ये ठेवा.

4. संत्र हे फळ काही वेळ फ्रिजमध्ये ठेवता येतात, पण जास्त वेळ ठेवल्यास त्याचा रस कमी होतो आणि आतुन सुकू लागतो आणि साल कडक होते. संत्र या फळांची साल जाड असली तरी फ्रिजमध्ये ठेवल्यास लवकर कडु होतो. म्हणून संत्री थंड पण ओलसर जागी, जसे की जाळीच्या टोपलीत साठवणे चांगले.

5. ​पपई हे उष्णकटिबंधीय फळं असून ती नैसर्गिकपणे पिकण्यासाठी गरम वातावरणाची गरज असते. कच्ची किंवा अर्धपिकलेली पपई फ्रिजमध्ये ठेवल्यास पिकत नाही. त्यातील एंजाइम पिकण्याची प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे पपई आतून घट्ट आणि गोडवा कमी होतो. पिकलेली पपई कापल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवता येते, परंतु न कापलेली फळे खोलीच्या तपमानावर ठेवावीत.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.