तुम्ही झोपेतून जागे झाल्यावर सकाळी चहा पिता का? ही गोष्ट आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते

तुम्हाला सकाळचा चहा आवडतो का? आपण एकटे नाही आहात! असे अनेक लोक आहेत जे आपल्या दिवसाची सुरुवात रिकाम्या पोटी चहाने करतात. पण, सकाळी चहासारखे कॅफिनयुक्त पेय पिणे ही गोष्ट आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते.

तुम्ही झोपेतून जागे झाल्यावर सकाळी चहा पिता का? ही गोष्ट आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते
तुम्हाला सकाळचा चहा आवडतो का?
Image Credit source: (Image Google)
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

May 06, 2022 | 11:23 AM

तुम्ही झोपेतून उठताच सकाळी चहा पिता का ?सकाळी झोपेतून उठल्यावर सर्वात आधी चहा पिण्याची सवय अनेकांना असते. काही जण तर ब्रश न करताही चहा पितात (बेड टी) . गरम चहा प्यायल्याने फ्रेश वाटतं खरं. पण, आरोग्याच्या दृष्टीने सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे अजिबात चांगले नसते. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने आरोग्याच्या विविध समस्या कालांतराने होतात. सकाळी काही न खाता पिता चहा प्यायल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात जाणून घेऊ या.

1). माऊथ अल्सर

अल्सर म्हणजेच साधारणपणे आपण याला तोंड येणं असं म्हणतो. रात्री जेवणानंतर सहा ते सात तास पोट रिकामे असते. त्यानंतर सकाळी झोपेतून उठल्या नंतर लगेच चहा प्यायल्याने पोटातील आम्ल पित्त खवळते. त्याने अल्सरची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे सकाळी झोपेतून उठल्या उठल्या रिकाम्या पोटी चहा पिणे टाळणं कधीही उत्तम.

2). अपचनाच्या तक्रारी वाढू शकतात

सकाळी झोपेतून उठल्या उठल्या चहा प्यायल्याने पोट साफ होते. मोशन होण्यास मदत होते असं अनेकाना वाटते. मात्र चहामुळे गॅसची तक्रार वाढते. चहाच्या अतिसेवनामुळे पचनक्रिया मंदावते आणि पोटाच्या तक्रारी सुरू होतात. त्यामुळे दिवसभरात तुम्ही चहा दोन ते तीन वेळा पित असाल तर ठिक आहे. पण सकळ सकाळी काही न खाता पिता चहा घ्यायची सवय तुम्हाला असेल तर अपचनाच्या तक्रारी वाढू शकतात.

3). ब्लड प्रेशर

ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या लोकांनी बेड टी घेऊ नये. कारण चहा शरीरासाठी गरम असतो. त्यात असलेले घटक कॅफीन शरीरात मिसळते. त्याने शरीरातील ब्लड प्रेशर आणखी वाढण्याची शक्यता असते. ब्लड प्रेशर अनेक शारीरिक आजारांचे मूळ असल्याने ब्लड प्रेशर वाढणं आजिबात चांगलं नसतं. ब्लड प्रेशर वाढल्याने शारीरिक समस्या वाढतात.

4). ताण तणाव वाढतो

चहा प्यायल्याने आपल्याला किती ही फ्रेश वाटत असलं तरी ही चहाने शरिरातील साखरेचे प्रमाण वाढते. चहाने ताण अधिक वाढतो. चहामध्ये कॅफीन असते ते प्यायल्याने झोप जाते. मात्र, त्यामुळे स्ट्रेस ताण, तणाव कमी होत नाही तर तो अधिक वाढतो. असं तज्ज्ञ म्हणतात.

5). साखरेचे प्रमाण वाढते

चहामध्ये साखर असते. सकाळ सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने शरिरातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. त्याने डायबिडीस होण्याची शक्यता बळावते. इतकंच नाही तर भविष्यात शरीरावर वाईट परिणाम ही चहाचे होत असतात.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें