उन्हाळ्यात आलं आठवडाभर राहतील ताजे, फक्त फॉलो करा या टिप्स
उन्हाळ्यात आलं लवकर खराब होते आणि त्याला बुरशी लागते. मात्र तुम्ही आलं योग्य प्रकारे साठवून ठेवल्यास अनेक दिवस ताजे राहू शकते. चला तर मग आजच्या लेखात आलं फ्रेश ठेवण्याच्या खास टिप्स जाणून घेऊयात.

उन्हाळ्याच्या दिवसात वाढत्या उष्णतेमुळे भाजीपाला तसेच इतर पदार्थ लवकर खराब होतात. अशातच रोजच्या जेवणात वापरलं जाणारं आलं देखील आपल्या आरोग्यासाठी केवळ अन्नाची चव आणि सुगंधच वाढवत नाही तर ते आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. पण उन्हाळा सुरू झाला की आलं लवकर खराब होण्याची होते. कारण उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे आलं खूप लवकर सुकते, त्यामधील रस निघून जातो आणि ते लवकर खराब होते. परिणामी जेवण बनवताना अनेकदा सुकलेलं आणि कडक आले वापरावे लागते, ज्यामुळे अन्नाच्या चवीवरही परिणाम होतो.
उन्हाळ्यात आलं दीर्घकाळ ताजे, रसरशीत आणि वापरण्यायोग्य ठेवायचे असेल, तर ते साठवण्याची योग्य पद्धत माहित असणे आवश्यक आहे. स्वयंपाकघरातील काही सोप्या टिप्स वापरून, तुम्ही आलं संपूर्ण आठवडाभर ताजे ठेवू शकता. या लेखात आपण आलं कडक उन्हात देखील आठवडाभर फ्रेश ठेवण्याच्या काही सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत.
पेपर टॉवेलचा वापर
आलं आठवडाभर फ्रेश ठेवण्यासाठी तुम्ही पेपर टॉवेलची ट्रिक्स वापरू शकता. आले स्वच्छ धुऊन पूर्णपणे कोरडे करा, ते पेपर टॉवेलमध्ये गुंडाळा आणि हवाबंद डब्यात ठेवा. यामुळे अतिरिक्त ओलावा साचत नाही आणि आले लवकर खराब सुद्धा होत नाही.
फ्रिजमधील व्हेजिटेबल सेक्शन मध्ये स्टोअर करा
उन्हाळ्यात बाहेरचे तापमान सहसा खूप जास्त असते. याचा परिणाम आल्यावरही होतो. तर या दिवसांमध्ये आलं ताजे ठेवण्यासाठी फ्रिजमधील व्हेजिटेबल सेक्शनमध्ये ठेवा. यामुळे ओलावा टिकून राहील आणि ते अनेक दिवस ताजे राहील.
झिप लॉक बॅग वापरा
आलं ताजे ठेवण्यासाठी झिपलॉक पिशव्या देखील एक उत्तम पर्याय आहेत. आलं स्वच्छ धुऊन पूर्णपणे कोरडे करा आणि ते एका झिपलॉक पिशवीत ठेवा. या पिशवीतील कमी हवेच्या प्रवाहामुळे आले लवकर खराब होत नाही आणि त्याची चव टिकून राहते.
लहान तुकडे करून फ्रीझरमध्ये ठेवा
तुमच्याकडे भरपूर आले असल्यास त्याचे लहान तुकडे करून ते फ्रीझरमध्ये ठेवता येते. गरज पडेल तेव्हा लगेच वापरा. यामुळे आले जास्त काळ टिकते आणि ते वारंवार खराब होण्यापासून वाचते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)