
कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणारा सर्वात सामान्य आजार म्हणजे रेबीज. जर एखादा कुत्रा चावला आणि त्याला याबाबत कोणत्याही प्रकारची लस दिलेली नसेल तर नक्कीच त्या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. आणि माणसाला रेबीज हा आजार होऊ शकतो. पण हे फार कमी जणांना माहित असेल की कुत्रा चावल्यामुळे फक्त रेबीज हा आजार होत नाही तर इतर अनेक आजारही होतात. आणि अर्थातच त्या आजारांमुळे देखील माणसाचा मृत्यू होऊ शकतो. जाणून घेऊयात की ते कोणते आजार आहेत.

कुत्र्याच्या शरीरातील संसर्ग आणि जीवाणू शरीरात जाणे : राजस्थान पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठाचे डॉ. एन.आर. रावत म्हणतात की कुत्र्याच्या चाव्यामुळे झालेल्या दुखापतीतून कुत्र्याच्या शरीरातील एक जीवाणू पीडिताच्या शरीरात प्रवेश करतो. या जीवाणूचे नाव कॅपनोसाइटोफागा कॅनिमोर्सस आहे. वृद्ध, मधुमेही किंवा कर्करोगाच्या रुग्णांसारख्या कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांसाठी हा जीवाणू अधिक प्राणघातक ठरू शकतो. हा जीवाणू शरीरात संसर्ग पसरवतो, ज्यामुळे दुखापतीच्या ठिकाणी किंवा चाव्याच्या ठिकाणी पू तयार होणे, सूज येणे आणि त्वचेचा लालसरपणा यासारखी गंभीर लक्षणे दिसून येतात. वेळेवर उपचार न केल्यास हा संसर्ग घातक ठरू शकतो.

सेप्सिस: जर कुत्रा चावल्यानंतरची जखम योग्यरित्या स्वच्छ केली नाही किंवा डॉक्टरांनी वेळेवर ती दाखवली नाही तर बॅक्टेरिया तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये पसरू शकतात, ज्यामुळे सेप्सिस होतो. या आजारात रक्त कमी होणे, रक्तवाहिन्या ब्लॉक होणे आणि अवयव निकामी होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. कोणत्याही सामान्य जखमेसारखी ही जखम नसते. ती नक्कीच जीवघेणी असते.

कुत्र्याच्या चाव्याला हलक्यात घेऊ नका. वैद्यकीय उपचारांसोबतच, चावल्याने झालेली जखमेची जागा स्वच्छ करायला विसरू नका. जर तुम्हाला जखम झाली असेल तर चाव्याची जागा ताबडतोब स्वच्छ पाणी आणि एंटीसेप्टिक लिक्विडने धुवा. जर तुम्हाला लालसरपणा, पू किंवा सूज दिसली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. जर टिटॅनसची लस म्हणजे धनुर्वाताचं इंजेक्शन घ्या किंवा बूस्टर घेण्यास विसरू नका. जर तुम्हाला कुत्र्याच्या चाव्याभोवती जळजळ, ताप किंवा अशक्तपणा यासारखी लक्षणे जाणवत असतील तर ती सेप्सिसची लक्षणे असू शकतात. कुत्र्याच्या चाव्याला 'किरकोळ अपघात' मानण्याची आणि त्याबद्दल विसरून जाण्याची चूक करू नका. ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्या.

ही भटकी कुत्री माणसांवर हल्ले का करतात किंवा भटके कुत्रे इतके आक्रमक का होतात याचा कधी विचार केला आहे का? सहसा पाळीव कुत्र्यांना एखाद्यावर हल्ला करण्याचे प्रशिक्षण दिले जाते किंवा पाळीव कुत्र्याला चूक झाल्याचे कळते आणि तो मागे हटतो. परंतु भटक्या कुत्र्यांचा स्वभाव भक्षक असतो जो अगदी थोडासा जरी धोका जाणवला तरी तो हल्ला करतो. याशिवाय, पाळीव कुत्र्यांना लसीकरण केले जाते तर भटक्या कुत्र्यांना लसीकरण केले जात नाही. त्यामुळे त्यांच्या चाव्यामुळे रेबीज किंवा सेप्सिस सारख्या इतर आजारांचा धोका जास्त असतो. त्यासाठी काळजी घ्या आणि कुत्र्याचे नख असो किंवा दात लागो घरगुती उपचार करण्यापेक्षा थेट डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्या.