रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोज सकाळी प्या काळ्या मनुक्याचे पाणी !

| Updated on: May 14, 2021 | 10:36 AM

काळे मनुके खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोज सकाळी प्या काळ्या मनुक्याचे पाणी !
काळ्या मनुक्याचे पाणी
Follow us on

मुंबई : काळे मनुके खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. काळ्या मनुक्यांमध्ये प्रथिने, कार्ब, फायबर, साखर, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि व्हिटामिन सी सारखे अनेक पोषक घटक असतात. हे अशक्तपणापासून हृदय, बीपी, हाडे, पोट, केस आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, दररोज सकाळी रिकाम्या पोटी काळे मनुके खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. (Drink Black Raisins water to boost the immune system)

काळ्या मनुक्याचे पाणी पिण्यामुळे आपल्या शरीरास बर्‍याच फायद्यांसह ऊर्जा मिळेत. विशेष म्हणजे मनुक्याचे पाणी पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. मनुक्याचे पाणी तयार करण्याासाठी तीन कप पाणी आणि 160 ग्रॅम मनुका घ्या. एका भांड्यात पाणी उकळा. जेव्हा पाणी पूर्णपणे उकळले जाईल, तेव्हा त्यात मनुका घाला आणि रात्रभर भिजत ठेवा. नंतर सकाळी पाणी मोठ्या आचेवर तापवा. हे पाणी दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्या. परंतु, हे लक्षात ठेवा की हे पाणी प्यायल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ किंवा पिऊ नका.

हे पाणी पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. काळ्या मनुकामध्ये बोरॉन हा घटक आढळतो, जो हाडांच्या विकासासाठी ओळखला जातो. या व्यतिरिक्त त्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण देखील असते, जे हाडांची घनता मजबूत करते. ऑस्टिओपोरोसिसच्या समस्येमध्ये काळ्या मनुका खूप उपयुक्त आहेत. पोटॅशियम आणि फायबर हे दोन्ही घटक उच्च रक्तदाब नियंत्रित करतात, असे मानले जाते. काळ्या मनुकांमध्ये या दोन्ही गोष्टी भरपूर प्रमाणत आहेत, त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरते.

बॅड कोलेस्ट्रॉल ‘एलडीएल’ हे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याच्या कारणांपैकी एक मानले जाते. काळ्या मनुकामधील पॉलिफेनॉल आणि फायबर रक्तातील कोलेस्टेरॉल आणि चरबी काढून टाकण्याचे काम करतात. अशाप्रकारे, काळ्या मनुकाचे सेवन हृदयाला सर्व गंभीर समस्यांपासून वाचवण्यासाठी कार्य करते. शरीरात लोह आणि व्हिटामिन सी सारख्या पोषक तत्वांचा अभाव हे देखील केस गळण्याचे एक कारण आहे. काळ्या मनुकाचे पुरेसे सेवन केल्याने शरीरातील या पोषक तत्वांची कमतरता दूर होते, ज्यामुळे केस गळण्याची समस्या नियंत्रित होते आणि केसांची वाढ सुधारते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Pain Killer Side Effects | हलक्याशा वेदनांसाठीही ‘पेन किलर’ घेताय? किडनी होऊ शकते निकामी!

Skin Care | त्वचेला चमकदार बनवेल ‘हा’ हेल्दी ज्यूस, जाणून घ्या याचे फायदे…

(Drink Black Raisins water to boost the immune system)