AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight loss : निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी ‘हे’ चार चहा प्या !

सकाळी झोपेतून उठलं की सर्वात आधी कुठल्या गोष्टीची गरज वाटत असेल तर तो म्हणजे चहा. त्यातच भारतातील चहाची चव ही जगभरात प्रसिद्ध आहे.

Weight loss : निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी 'हे' चार चहा प्या !
खास पेय
| Updated on: May 11, 2021 | 1:33 PM
Share

मुंबई : सकाळी झोपेतून उठलं की सर्वात आधी कुठल्या गोष्टीची गरज वाटत असेल तर तो म्हणजे चहा. त्यातच भारतातील चहाची चव ही जगभरात प्रसिद्ध आहे. काही लोकांना चहाऐवजी कॉफी पिणे देखील आवडते. आत्तापर्यंत तुम्ही ऐकले असेलच की चहा पिण्यामुळे आरोग्यास हानी पोचते. पण आम्ही तुम्हाला अशा काही खास चहाविषयी सांगत आहोत जे प्यायल्याने तुम्ही निरोगी व्हाल. तसेच या चहामुळे तुमचे वजन देखील कमी होण्यास मदत होते. (Drink herbal tea to stay healthy and fit)

ग्रीन टी – चयापचय सुधारते संशोधनानुसार, ग्रीन टीमध्ये आढळणारे केमिकल ईजीसीजी आहे, जे शरीरातील चयापचय वाढविण्याचे काम करते. ज्यामुळे आपले वजन कमी होते. हे एका दिवसात 70 कॅलरी बर्न करू शकते. ग्रीन टी अँटीऑक्सिडेंटची पातळी वाढवण्याचे काम करते. त्यात उपस्थित कॅटेचिन अँटीऑक्सिडेंट्स शरीराच्या चयापचय दर वाढविण्यात मदत करते.

गुलाब चहा – बद्धकोष्ठता दूर करते गुलाब चहा सर्व चहापैकी सर्वात जुना आहे. हा चहा गुलाब आणि चहा पावडर एकत्र करुन बनविला जातो. जो आपल्या शरीरासाठी औषधी म्हणून काम करतो. याशिवाय शरीराचे विष द्रव काढून टाकते आणि त्वचा सुंदर बनविण्यात मदत करते. गुलाब चहामध्ये अ, बी 3, सी, डी, ई जीवनसत्त्वे असतात. जे संक्रमणास लढण्यास मदत करतात. तसेच बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होते. हा चहा वजन कमी करण्यास देखील मदत करतो.

लेमन टी – रोगप्रतिकारक शक्ती ‘लेमन टी’ पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. ‘लेमन टी’चे नियमित सेवन फायदेशीर ठरू शकते. जर रोगप्रतिकारक शक्ती चांगली नसेल, तर हवामान बदलल्यामुळे लोकांना त्रास होऊ लागतो. अशा लोकांना ताप, सर्दी, खोकला येणे, घसा खवखवणे, छातीत श्लेष्मा, कफ यासारखे त्रास उद्भवू लागतात. यावर आले आणि लिंबू घातलेला चहा गुणकारी ठरतो. आले-लिंबूयुक्त चहा या समस्यांपासून आपले संरक्षण करतो आणि आपली रोगप्रतिकार शक्ती सुधारतो.

गवती चहा – रोगांपासून दूर ठेवतो गवती चहा पिण्याऱ्यांची संख्या अधिक आहे. कारण गवती चहामुळे पोषक तत्व, विटॅमिन, अँटीऑक्सिडेंट मिळतात. हा चहा पुर्णपणे आयुर्वेदिक चहा आहे. गवती चहाच्या सेवनामुळे पोटदुखी सारखे विकार देखील दूर होतात. जर तुमचे खूप डोके दुखत असेल तर गवती चहा घ्यावा यामुळे तुमची डोकेदुखी दूर होईल. गवती चहाच नाहीतर त्याचा काढा देखील खूप प्रभावी आहे. ताप सर्दी आणि खोकला येत असेल तर दिवसातून साधारण तीन ते चार वेळा गवती चहा पिलातर तुम्हाला बरे वाढेल.

संबंधित बातम्या : 

(Drink herbal tea to stay healthy and fit)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली