Ear Pain Causes | कान दुखीच्या त्रासाची कारणे अनेक, जाणून घ्या घरगुती उपायांबद्दल…

कधीकधी कानाच्या दुखण्यामुळे ते नीट ऐकू येत नाही. काही लोकांच्या कानांतून पिवळा अथवा पांढरा स्त्राव देखील येतो.

Ear Pain Causes | कान दुखीच्या त्रासाची कारणे अनेक, जाणून घ्या घरगुती उपायांबद्दल...
कान दुखणे ही एक सामान्य समस्या आहे. अशावेळी दोन्ही कानात वेदना होऊ शकते.
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 2:03 PM

मुंबई : कान दुखणे ही एक सामान्य समस्या आहे. अशावेळी दोन्ही कानात वेदना होऊ शकते. मात्र, बहुतेक वेळा एकाच कानात वेदना होते. कान दुखण्याची समस्या थोडा काळ किंवा बराच काळ देखील टिकू शकते. या वेदने दरम्यानचे ठणके कधीकधी सौम्य तर कधी अतिशय त्रासदायक असू शकतात. कानाच्या संसर्गाशिवाय, कान दुखण्यामागे इतरही कारणे आहेत. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया…(Ear Pain Causes, Precautions and home remedies)

कान दुखीची लक्षणे

कधीकधी कानाच्या दुखण्यामुळे ते नीट ऐकू येत नाही. काही लोकांच्या कानांतून पिवळा अथवा पांढरा स्त्राव देखील येतो. कानाच्या दुखण्यामुळे मुलांना अधून मधून ताप येणे, झोपेत व्यत्यय, कानामध्ये ताणल्यासारखे वाटणे, चिडचिड, डोकेदुखी आणि भूक न लागणे या समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते.

कान दुखीची ही सामान्य कारणे

दुखापत, संसर्ग, कानात जळजळ यामुळे कान दुखू शकतात. जबडा किंवा दातदुखीमुळेही कान दुखीची समस्या निर्माण होते. संसर्गामुळे कानात वेदना होतात. याशिवाय पोहणे, हेडफोन वापरणे, कानात कापूस किंवा बोट घातल्यामुळे कानाच्या बाहेरील बाजूसही संक्रमण होऊ शकते. कानाच्या आतील त्वचा सोलली गेल्यामुळे किंवा कानात पाणी गेल्यामुळे संसर्ग होऊ शकतो. श्वसनमार्गाच्या संसर्गामुळे कानात मध्यभागी संसर्ग होऊ शकतो. कानात गोठलेले द्रव स्त्राव देखील बॅक्टेरियांना कारणीभूत ठरतो. लॅबीरिंथाइटिसमुळे कान आतून सूजण्यास सुरुवात होते.

कानदुखीची इतर कारणे

हवेचा दाब, कानातला मळ, घसादुखी, सायनस इन्फेक्शन, कानात शॅम्पू किंवा पाणी जाणे, कापूस घालणे, टेम्पोरोमेडीब्युलर जॉइंट सिंड्रोम, कान टोचणे, दात दुखी, कानात एक्झिमा ही देखील कान दुखीची करणे आहेत(Ear Pain Causes, Precautions and home remedies).

घरच्या घरी उपचार

कानाच्या किरकोळ दुखण्यावर घरी उपचार केला जाऊ शकतो. यासाठी थंड कपड्याने कानांना शेक द्या. आपले कान ओले होणार नाहीत, याची काळजी घ्या. कानावरील दाबांपासून मुक्त होण्यासाठी, सरळ बसा. चिंगम चघळत असतानाही, कानावर दबाव कमी असतो. नवजात बालकाच्या कानात दुखत असेल तर त्याला दूध पाजा. यामुळे कान दुखी कमी होईल.

वैद्यकीय उपचार

जर तुमच्या कानात तीव्र वेदना होत असतील आणि ताप असेल तर त्वरित डॉक्टरांना भेटा. यासाठी, डॉक्टर आपल्याला काही अँटी बायोटीक आणि इअर ड्रॉप्स देऊ शकतात. याने कान दुखी थांबल्यानंतरही कधीही औषध घेणे चुकवू नका. औषधाचा कोर्स पूर्ण होईपर्यंत संसर्ग पूर्णपणे बरा होणार नाही.

या गोष्टी लक्षात ठेवा!

जर आपल्याला वारंवार कान दुखीची समस्या येत असेल तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. उदाहरणार्थ, सिगरेट पिऊ नका, कानात कोणतेही प्रकारचे साधन टाकू नका, आंघोळ किंवा पोहल्यानंतर कान व्यवस्थित सुकवा, धूळ आणि अॅलर्जी टाळा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Ear Pain Causes, Precautions and home remedies)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.