तुम्ही अंडी खाण्याचे शौकीन आहात? मग ‘ही’ बातमी अगोदर वाचा…

अंडी खाणे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अंड्यामध्ये ‘व्हिटामिन डी’ आढळते, जे तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरतो.

तुम्ही अंडी खाण्याचे शौकीन आहात? मग 'ही' बातमी अगोदर वाचा...
अंडी
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 9:30 AM

मुंबई : अंडी खाणे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अंड्यामध्ये ‘व्हिटामिन डी’ आढळते, जे तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरते. अंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात. अंड्यात कॅलरी, प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6 यासारखे पोषक असतात. (Eating 1 egg daily is beneficial for health)

बरेच लोक व्यायाम केल्यानंतर दररोज अंडी खातात. मात्र, काही लोक प्रमाणाबाहेर अंडी खातात याचे खातक परिणाम शरीरावर होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, आपल्या आरोग्यासाठी किती अंडी खाणे योग्य आहेत. अंडीमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण चांगले असते. एका अंड्यामध्ये 200 मिलीग्रामपर्यंत कोलेस्ट्रॉल असते. एका अभ्यासानुसार, शरीराला एका दिवसात जास्तीत जास्त 300 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल द्यावे.

जेव्हा कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त होते त्यावेळी आपल्या शरीराला हानी पोहोचवू शकते. दिवसात किती अंडी खाणे योग्य आहे. यावर बऱ्याच अभ्यासात दिसून आले आहे की, आठवड्यात जास्तीत जास्त सात अंडी खाल्ली पाहिजेत. अंडी चांगली शिजवून मगच खावीत. कारण अंड्यांमध्ये साल्मोनेला नावाचा एक बॅक्टेरिया आढळून येतो. हा बॅक्टेरिया कोंबडीपासून अंड्यांमध्ये येतो. त्यामुळे अंडी चांगल्याप्रकारे शिजवून खाल्ली नाही तर तुम्हाला अनेक आजारांना सामोरं जावं लागू शकतं.

या बॅक्टेरियामुळे फूड पॉयझनिंगही होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही अंड्याचं ऑम्लेट किंवा अन्य कुठलाही प्रकार खात असाल तर ते चांगल्या रितीनं शिजवूनच खा. नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ हार्ट ने दिलेल्या माहितीनुसार अंड्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे आपल्या शरिरात कॅलरीजचं प्रमाणही वाढतं. ज्या लोकांना हाय बीपी, मधुमेह आणि हृदयासंदर्भात आजार आहेत त्यांनी अंड्यातील पिवळा बलक खाणं टाळलं पाहिजे.

संबंधित बातम्या : 

(Eating 1 egg daily is beneficial for health)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.