वजन कमी करायचेय? मग, आहारात उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ नक्की समाविष्ट करा !

जवळपास प्रत्येकजण वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, असे नाही की प्रत्येकाचेच वजन कमी होते.

वजन कमी करायचेय? मग, आहारात उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ नक्की समाविष्ट करा !
तुम्ही कधी कच्च्या खाद्यपदार्थांचा डाएट ट्राय केला आहे का? जाणून घ्या वनस्पती आधारीत पोषणाचे फायदे
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 9:58 AM

मुंबई : जवळपास प्रत्येकजण वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, असे नाही की प्रत्येकाचेच वजन कमी होते. वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे आपण काय खातो हे आहे. परंतू अनेक वेळा वजन कमी करण्याच्या नादात आपण आहारातून शरीराला आवश्यक असलेले पदार्थ घेणे देखील टाळतो. (Eating high protein foods helps in weight loss)

यामुळे आपल्या शरीराला धोका निर्माण होऊ शकतो. आहारात अशा काही गोष्टी घेतल्या पाहिजेत की, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो आणि हाडांचे नुकसान होण्यापासून प्रतिबंधित होते. अंडी आपल्या स्नायूंच्या तंदुरुस्तीसाठी देखील खूप उपयुक्त आहेत. याव्यतिरिक्त आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यात, रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात आणि वजन कमी करण्यास अंडी खूप प्रभावी आहेत.

तुम्हाला हे माहिती आहे का? की, दररोज सकाळी नाश्त्यामध्ये अंडी खाल्ली तर आपल्या आरोग्याला नेमकी कोणते फायदे होतात. अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणत ‘व्हिटामिन डी’ आढळतो, जो तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरतो. अंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात. अंड्यात कॅलरी, प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6 यासारखे पोषक असतात.

अॅवकाडो हे फळ आरोग्यासाठी चांगले आणि एक पौष्टिक फळांपैकी आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारचे महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे आहेत. या फळामुळे पचन सुधारते, वजन कमी करण्यास मदत होते. विशेष म्हणजे यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. हे फळ सलादमध्ये जास्त करून वापरले जाते. मेटॅबोलिक सिंड्रोम अॅवकाडोमुळे कमी होतो. अॅवकाडो सेवन करणाऱ्यांना ई जीवनसत्त्व, तांबे, मॅग्नेशियम, क जीवनसत्त्व, फोलेट, कबरेदके मिळतात. अॅवकाडो सेवनाने इन्शुलिन व होमोसिस्टीनचे प्रमाण योग्य राहते.

स्किनलेस चिकन हे प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. इतर मांसाच्या तुलनेत यामध्ये चरबी कमी असते, जे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. तसेच, आपण यास कोशिंबीरी किंवा सँडविचमध्ये समाविष्ट करू शकता किंवा आपण भाजीपाला जेवण किंवा स्नॅक म्हणून देखील चिकन खाऊ शकता. चिकन खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

ग्रीक दहीमध्ये नेहमीच्या दह्यापेक्षा जास्त प्रथिने आणि कमी साखर असते आणि घट्ट सुसंगतता असते. त्यामध्ये प्रोबियोटिक्सनचे प्रमाण आधिक असते आणि त्यामुळे आंतड्यांचे आरोग्य, पचन आणि हृदय आरोग्य सुधारते आपण प्रथिने आणि फायबर घटक सुधारण्यासाठी ग्रीक दह्याचा आहारामध्ये समावेश करणे आवश्यक आहे.

हे डाएट कमी कॅलरीजवर आधारीत आहे. जर तुम्ही हे डाएट फॉलो करीत असाल तर केवळ 20 मिनिटे चालणे पुरे आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याव्यतिरिक्त अन्य काही एक्सरसाईज जरुरी नाही. मात्र हे डाएट फॉलो करताना तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमी असू शकते ज्यामुळे तुम्हाला कमजोरी येऊ शकते. त्यामुळे हे डाएट फॉलो करण्याआधी तुमच्या न्यूट्रिशियनचा सल्ला अवश्य घ्या.

संबंधित बातम्या : 

Make Up Tips | मेकअप लावल्याने चेहऱ्यावर डाग पडतायत? मग वापरा ‘या’ सोप्या टिप्स…

(Eating high protein foods helps in weight loss)

'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.