Bird Flu | अंडी आणि चिकन खाणे सुरक्षित आहे की नाही? वाचा काय सांगतात FSSAI गाईडलाईन्स

Bird Flu | अंडी आणि चिकन खाणे सुरक्षित आहे की नाही? वाचा काय सांगतात FSSAI गाईडलाईन्स

जीवघेण्या कोरोना विषाणू विरुद्धची लढाई सुरु असतानाच आता ‘बर्ड फ्लू’ हा रोग जगातील अनेक देशांमध्ये आणि भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरला आहे.

Harshada Bhirvandekar

|

Jan 22, 2021 | 1:38 PM

मुंबई : जीवघेण्या कोरोना विषाणू विरुद्धची लढाई सुरु असतानाच आता ‘बर्ड फ्लू’ हा रोग जगातील अनेक देशांमध्ये आणि भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरला आहे. अशा परिस्थितीत चिकन आणि अंडी खावी का? असा संभ्रम खावय्यांमध्ये निर्माण झाला आहे. बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री उत्पादने खाणे सुरक्षित आहे की नाही याबद्दल सर्वसामान्य चिंतीत आहेत. फ्लूचा प्रादुर्भाव होण्याची भीती असल्याने चिकन आणि अंडी यांची मागणी आणि किंमत दोन्हीमध्ये कमालीची घट झाली आहे. बर्ड फ्लूच्या संसर्गाबद्दल अनेकवेळा अपूर्ण आणि चुकीची माहिती सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मवर पसरत आहेत (FSSAI release guidelines on bird flu infection fear).

या सगळ्या गोंधळामुळे भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) यांनी या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी करून या परिस्थितीवर भाष्य केले आहे. अन्न सुरक्षा प्राधिकरणाने असे म्हटले आहे की, हा विषाणू 70 डिग्री सेल्सिअस तापमानात केवळ 3 सेकंदात मरतो. जर सर्व प्रकारचे मांस आणि अंडी 74 डिग्री सेल्सिअस तापमानावर शिजवल्या गेल्या असतील, तर त्यातील विषाणूचा मृत्यू होतो. म्हणूनच, पोल्ट्री व्यवसायाशी संबंधित व्यावसायिक आणि ग्राहकांना घाबरून जाण्याची गरज नाही. एफएसएसएआयने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये व्यापारी आणि ग्राहकांना काय करावे आणि काय करू नये याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा

– अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नयेत.

– कोंबडीचे मांस शिजत असताना ते खाऊ नका.

– उघड्या हातांनी मृत पक्ष्यांना स्पर्श करु नका.

– केवळ स्वच्छ आणि पूर्णपणे शिजवलेले चिकन आणि अंडी खा.

– संक्रमित भागात पक्ष्यांशी थेट संपर्क टाळा (FSSAI release guidelines on bird flu infection fear).

– कच्च्या मांसाशी थेट संपर्क टाळा.

– कच्चे मांस घरातील मोकळ्या जागेत ठेवू नका.

– कोंबडीचे कच्चे मांस हाताळताना मास्क आणि ग्लोव्हज वापरा.

– वारंवार हात स्वच्छ धुवा.

– स्वयंपाकघर आणि जवळपासची जागा स्वच्छ ठेवा.

डब्ल्यूएचओचा सल्ला

मांस आणि अंडी खाण्याच्या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) असेही म्हटले आहे की, पोल्ट्री मांस आणि अंडी खाण्यास पूर्णपणे सुरक्षित आहेत. डब्ल्यूएचओच्या अधिकृत संकेतस्थळाच्या मते, योग्य प्रकारे शिजवलेले मांस आणि अंडी वापरुनही मानवी शरीरात विषाणूचा प्रसार झाला आहे, हे सिद्ध करणारी कोणतीही घटना किंवा महामारीविज्ञाना संबंधित कोणताही डेटा अद्याप उपलब्ध नाही.

(FSSAI release guidelines on bird flu infection fear)

हेही वाचा :

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें