AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beauty Tips : चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी अंडयाचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर, वाचा !

अंडी खाणे जसे आपल्या निरोगी आयुष्याठी फायदेशीर तसेच आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे.

Beauty Tips : चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी अंडयाचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर, वाचा !
सुंदर त्वचा
| Updated on: May 11, 2021 | 2:36 PM
Share

मुंबई : अंडी खाणे जसे आपल्या निरोगी आयुष्याठी फायदेशीर तसेच आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे. अंडींमध्ये प्रथिने, जीवनसत्व ए, फोलेट, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, फॉस्फरस, कोलीन आणि सेलेनियम यासारखे सर्व पोषक घटक असतात. अंडींमध्ये अशी अनेक खनिजे आढळतात, ज्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. (Egg face pack is beneficial for removing wrinkles on the face)

सुरकुत्या काढून टाकण्यासाठी अंड्यामध्ये मध मिसळा आणि दररोज चेहऱ्यावर लावा. हे आपल्या त्वचेला पोषण देईल तसेच एका आठवड्यात आपल्या चेहऱ्यावरही फरक दिसून येईल. सलग 15 दिवस हे केल्यानंतर, आपण दर दोन ते तीन दिवसांनी हे लागू शकतो. हे केल्याने आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यास मदत होते.

अंडी आणि मध फेसपॅक अंड्यातील फक्त पिवळा बलकमध्ये एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण चेहर्‍यावर लावा आणि नंतर ते पाण्याने धुवा. त्यात असलेले मध त्वचेला मॉइश्चराइझ ठेवते. हा पॅक वापरल्यानंतर तुमची त्वचा मऊ आणि चमकदार होते.

अँटी-एजिंग फेसपॅक अंडी फेसपॅक वृद्धत्वाचा प्रभाव लपविण्यासाठी देखील कार्य करते. कारण त्यामध्ये वृद्धत्व विरोधी गुणधर्म असतात. हा पॅक तयार करण्यासाठी 1 अंडे घ्या आणि त्यामध्ये 4 ते 5 थेंब तेल मिक्स करा. हे चांगले मिसळा आणि संपूर्ण चेहऱ्याला यावर लावा आणि कोरडे झाल्यावर चेहरा धुवा.

मुरुमांपासून मुक्त करण्यासाठी एक चमचा संत्राच्या रसात अंडे घाला आणि चांगले मिसळा. जेंव्हा या मिश्रणाला फेस येतो तेव्हा त्यात अर्धा चमचा हळद घाला आणि चेहऱ्यावर लावा. काही वेळाने हलक्या हाताने चेहऱ्यावर मालिश करा. कोरडे झाल्यानंतर ते स्क्रब करून काढा. असे काही दिवस केल्याने मुरुमांच्या समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

(टीप : वरील लेख हा सामान्य माहितीवर आधारित आहे. उपचारांपूर्वी आपण सौंदर्यतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

संबंधित बातम्या : 

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Egg face pack is beneficial for removing wrinkles on the face)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली