
पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात गेल्याने आपल्याला खूप फ्रेश जाणवते. कारण या दिवसांमध्ये बाहेरील वातावरण थंडगार असतं, तसेच निसर्गाचे अद्भूत सौंदर्य पाहुन एक वेगळाच अनुभव येतो. कारण रोजच्या या धावपळीत आपण स्वत:ला वेळ द्याला विसरत असतो आणि कामाच्या तणावामुळे आपण सतत चिंतेत असतो. तर यापासून ब्रेक घेऊन ताजेतवाने वाटण्यासाठी आपण बाहेर फिरायला जाण्याचा किंवा प्रवासाचा प्लॅन करत असतो. त्यातच आपल्यापैकी अनेकजण हे निसर्गप्रेमी आहेत ज्यांना पावसाळ्यात अनेक ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात जायला खूप आवडते. तुम्हालाही या पावसाळ्यात बाहेर फिरायला जाण्याची इच्छा असेल तर तुम्ही महाराष्ट्रातील ही काही ठिकाणं एक्सप्लोर करू शकता.
महाराष्ट्र नेहमीच त्याच्या सौंदर्यासाठी ओळखला जातो. पुणे आणि मुंबईसारख्या प्रमुख शहरांमधील लोकांची जीवनशैली कितीही व्यस्त असली तरी, ते तिथून काही अंतरावर असलेल्या हिल स्टेशनवर जाऊन त्यांचा सर्व थकवा दूर करू शकतात आणि शांततेचे क्षण घालवू शकतात. तर महाराष्ट्रात असलेले हिल स्टेशन खूप सुंदर आहेत आणि ते पाहून तुमचे मन मोहित होईल. चला तर मग या ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात…
1. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असलेले महाबळेश्वर हे सुंदर आणि प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक आहे. येथील हिरवळ आणि डोंगर पाहून तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल. महाबळेश्वर स्ट्रॉबेरी फळाच्या लागवडीसाठी खूप प्रसिद्ध आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून दूर शांततेत वेळ घालवू इच्छिणाऱ्यांसाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे.
2. तोरणमाळ हे महाराष्ट्रातील एक ऑफ-बीट हिल स्टेशन आहे जे त्यांच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील हवामान वर्षभर खूप आल्हाददायक असते, परंतु पावसाळ्यात येथे येण्याची मजा काही औरच असते. जर तुम्ही रोजच्या धावपळीपासून दूर शांत ठिकाण शोधत असाल तर हे एक परिपूर्ण ठिकाण असू शकते.
3. पाचगणी हे नाव 5 पर्वतांच्या नावावरून पडले आहे. ते त्यांच्या सौंदर्यासाठी आणि शांत वातावरणासाठी खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही वर्षाच्या कोणत्याही वेळी या ठिकाणी भेट देऊ शकता. येथील सुंदर सूर्यास्त बिंदू म्हणजे सिडनी व्ह्यू पॉइंट आणि पारशी व्ह्यू पॉइंट जिथून तुम्ही सूर्यास्त पाहू शकता.
4. माथेरान हे आशियातील पहिले ऑटोमोबाईल फ्री हिल स्टेशन आहे. म्हणून जर तुम्हाला गर्दीपासून दूर आणि निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ घालवायचा असेल तर हे तुमच्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण असू शकते. कुटुंब आणि मित्रांसह सहलीसाठी हे ठिकाण परिपूर्ण आहे.
5. लोणावळा हे नेहमीच महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक राहिले आहे. येथील हिरवळ आणि टेकड्या खरोखरच सुंदर दिसतात. येथे खूप सुंदर धबधबे देखील आहेत जे पावसाळ्यात आणखी सुंदर दिसतात.