AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fashion Tips: पार्टीसाठी तयार होतांना लुक्ससाठी.. दीपिका पादुकोणच्या ‘या’ ब्युटी टिप्स् नक्की करा फॉलो!

पार्टीला जाण्यापूर्वी आपल्याला सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे आपण आपला मेकअप कसा करू. त्यासाठी आपण अनेक दिवस तयारी सुरू करतो. तुम्हालाही पार्टीसाठी परफेक्ट लुक हवा असेल तर, दिपीका पादुकोणच्या या ब्युटी टिप्स नक्की फॉलो करा.

Fashion Tips: पार्टीसाठी तयार होतांना लुक्ससाठी.. दीपिका पादुकोणच्या ‘या’ ब्युटी टिप्स् नक्की करा फॉलो!
Deepika PadukoneImage Credit source: Facebook
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Aug 09, 2022 | 9:23 PM
Share

मुंबई : पार्टीसाठी तयार होतांना मनात हजार प्रश्न असतात, अशा स्थितीत आपला गोंधळ उडतो. मेकअप कसा करावा आणि काय घालावे हेच समजत नाही. अशा वेळी तुम्ही दीपिका पादुकोनच्या ब्युटी टीप्स (Deepika Padukone’s Beauty Tips) फॉलो करू शकता. ज्याद्वारे तुम्ही पार्टीला जाण्यासाठी तयार होऊ शकता आणि स्वत:ला छान लुक देऊ शकता. दीपिका पदुकोण अनेकदा ट्रेंड सेट करते. मग ती तिची कपड्यांची निवड असो वा मेकअपची. तिच्या लूक आणि दिसण्याने ती नेहमी मुलींना स्टाइल आणि फॅशनसाठी प्रेरित (Inspired by fashion) करते. नुकतीच ती जेव्हा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचली. त्यामुळे तिचा प्रत्येक लूक पूर्णपणे वेगळा आणि परफेक्ट होता. ज्यामध्ये ड्रेस, ज्वेलरी तसेच मेकअपचाही समावेश आहे. जर तुम्हाला रात्रीच्या पार्टीसाठी तयार व्हायचे असेल, आणि एक विशेष ब्युटी लुक्स दयायचा असेल. तर, दीपिका पादुकोणचे हे लुक्स नक्की फॉलो करा. तुम्हाला खूप सुंदर लुक (Beautiful look) मिळेल. त्यामुळे आता तुम्हाला पार्टी मेकअपसाठी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही, तर या टिप्स फॉलो करून तुमचा मेकअप घरीच करा.

गोल्डन आय

भारतीय त्वचेच्या टोनसह सोनेरी रंग सर्वात सुंदर दिसतो. जर तुम्ही पार्टीसाठी तयार होत असाल. तर, सोनेरी रंग मोकळ्या मनाने वापरा. यामुळे तुम्हाला परफेक्ट लुक मिळेल. दीपिका पादुकोणप्रमाणे न्यूड लिप कलरसह गोल्डन आयशॅडो वापरा. यामुळे सॉफ्ट लुकही येईल आणि मेकअप डोळ्यांमधून दिसेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या प्रकारच्या मेकअपला पारंपारिक आणि पाश्चात्य अशा दोन्ही प्रकारच्या ड्रेससोबत मॅच करू शकता. ते खुप छान दिसेल.

डार्क रेड लिपस्टिक

जर तुम्ही ओठांचा मेकअप करण्याच्या बाबतीत गोंधळत असाल तर काळजी करू नका. दीपिका पदुकोणसारखी डार्क लाल रंगाची लिपस्टिक लावा. तरुणी असो किंवा विवाहित महिला सर्वांनाच लाल रंग आवडतो. त्यामुळे डोळ्यांवर मस्कराचे दोन ते तीन कोट लावून ते सुंदर बनवा आणि ओठांना लाल लिपस्टिकसह बोल्ड लुक द्या. या प्रकारच्या मेकअपला काळ्या रंगाच्या आउटफिटसह आणखी सुंदर लुक दिला जाऊ शकतो.

आर्टीफीशअल आय

मेकअपच्या बाबतीत प्रयोग करायला आवडत असतील तर. दीपिका पादुकोणचा हा लूक तुम्हाला नक्कीच आवडेल. आर्टीफीशअल पापण्या आणि ग्राफिक डिझाइन आयशॅडो डोळ्यांना पूर्णपणे वेगळा लुक देते. फक्त न्यूड शेडमध्ये ओठांचा रंग एकत्र निवडा. हा लूक खूप सुंदर दिसेल आणि तुम्हाला गर्दीतही ठळक लुक देण्यास मदत करेल.

ब्राऊन आय

डोळ्यांवर तपकिरी रंगाचा वापरही तुम्ही अतिशय हुशारीने करू शकता. हे तुम्हाला कधीही मेकअपचा लुक देण्यास मदत करेल. तर दुसरीकडे, जर तुम्ही काजळ आणि आयशॅडोसोबत गडद तपकिरी शेड वापरत असाल तर दीपिका पादुकोणचा हा लुक वापरून पहा.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!