
आज महिलांच्या फॅशनचा अविभाज्य भाग ठरलेले हाय हील्स पूर्वी फक्त पुरुष वापरत असत, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल. पण फॅशनच्या इतिहासात अशी अनेक रंजक वळणं घडली आहेत. राजे-महाराजे, योद्धे आणि घोडेस्वार हिल्स वापरत असत, कारण त्यांना स्टेटस आणि उपयोगिता दोन्ही कारणांसाठी गरज होती. कालांतराने ही स्टाइल पुरुषांकडून स्त्रियांच्या सौंदर्यशोभेसाठी वापरली जाऊ लागली. चला, हाय हील्सचा हा मजेदार प्रवास जाणून घेऊया.
10 व्या शतकात पर्शियन साम्राज्यात घोडेस्वार सैनिक लढाई दरम्यान रकाबेत पाय नीट बसावा म्हणून त्यांच्या बूटांना “हिल” लावले जात होते. यामुळे घोड्यावरून झपाट्याने हालचाल करणं सहज व्हायचं. ही प्रॅक्टिकल गरज लवकरच १५व्या शतकात युरोपमध्ये पोहोचली आणि तेथे ‘हिल्स’ प्रतिष्ठेचे प्रतिक बनले.
फ्रान्सचा राजा लुई चौदावा याला तर हिल्सची विशेष आवड होती. तो नेहमी लाल रंगाच्या हिल्स असलेले शाही बूट वापरत असे. त्या काळी हिल्स घालणं म्हणजे संपन्नता आणि उच्च दर्जा याचं प्रतिक मानलं जायचं. त्यामुळे ते पुरुषांमध्ये एक फॅशन ट्रेंड बनलं होतं.
16 व्या शतकात हिल्सचा वापर महिलांमध्ये सुरू झाला. हे केवळ श्रीमंत स्त्रियांच्या फॅशनचा भाग होता. त्यानंतर 18 व्या शतकात पुरुषांनी हिल्स घालणं कमी केलं आणि त्याऐवजी बूट प्रचलित झाले. मात्र स्त्रिया मात्र हिल्सकडे अधिकाधिक आकर्षित होत गेल्या. हिल्स घालणं हे सौंदर्य, आत्मविश्वास आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचं प्रतीक बनलं.
सध्याच्या काळात हिल्स केवळ ट्रॅडिशनल आउटफिट्सपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. आता त्या वेस्टर्न आउटफिट्ससोबतही उत्तम जुळतात. बाजारात मिळणाऱ्या मिरर वर्क, बीडेड, ब्राइट कलरच्या हिल्स जुत्या आता तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत. काही डिझायनर तर पारंपरिक पंजाबी जोडीला ‘हिल्स जूती’चं मॉडर्न टच देऊन फॅशनमध्ये नवा ट्रेंड सेट करत आहेत.
आज जरी हिल्सचं प्रचलन महिलांमध्येच अधिक असलं, तरी त्याचा इतिहास पुरुषांपासून सुरू झाला, हे फार कमी लोकांना माहिती आहे. आता हिल्स म्हणजे केवळ एक फॅशन स्टेटमेंट नाही, तर प्रत्येक महिलेसाठी आत्मविश्वासाचं प्रतिक बनलं आहे.
शेवटी, फॅशन जगताच्या या प्रवासात हिल्सचं हे पाऊल किती ऐतिहासिक आणि अर्थपूर्ण आहे, हे लक्षात आलं की या छोट्या उंचीच्या टाचांनी खरं तर इतिहासात आपला ठसा उमटवला आहे.