AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

fashion Tips : हे कपडे प्रत्येक मुलीच्या ‘वॉर्डरोब’ मध्ये असलेच पाहिजेत; फॅशन ट्रेंडमध्ये दिसाल स्टायलिश!

ऋतू बदलला की मुलींच्या कपड्यांची फॅशन (fashion) बदलते. परंतु, प्रत्येक फॅशन ट्रेंडनुसार आपल्या वॉर्डरोबमध्ये कपडे असतील की नाही याबाबत मुली नेहमीच चिंतीत असतात. जाणून घ्या, तुमच्या वॉर्डरोबमध्ये कोणते कपडे आवश्यक आहेत.

fashion Tips : हे कपडे प्रत्येक मुलीच्या ‘वॉर्डरोब’ मध्ये असलेच पाहिजेत; फॅशन ट्रेंडमध्ये दिसाल स्टायलिश!
| Updated on: Jul 13, 2022 | 1:36 PM
Share

मुलींना फॅशनच्या बाबतीत नेहमीच अव्वल राहायचे असते, त्यामुळे त्यांच्याकडे विविध प्रकारच्या आउटफिट कलेक्शन (Outfit Collection) असतात. इतके पर्याय असूनही तिला नेहमी संभ्रम असतो की, आज काय घालायचे? सामान्यतः प्रत्येक मुलीला ही समस्या असते, पण आज आम्ही तुम्हाला अशा काही फॅशन टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची समस्या पूर्णपणे दूर होणार नाही पण काही प्रमाणात ती नक्कीच कमी होईल. यासाठी तुम्हाला फक्त थोडी सर्जनशीलता ( creativity) दाखवावी लागेल. तुमच्या वॉर्डरोबमध्ये ठराविक कपड्यांचा समावेश करा. हे कपडे प्रत्येक मुलीच्या वॉर्डरोबमध्ये असणे आवश्यक आहे. आजकाल सगळ्यांनाच तरुणाईचा ट्रेंड फॉलो करायला आवडतो. फॅशन आणि स्टाइल वाढवण्यासाठी तरुणाई वेगवेगळ्या युक्त्या अवलंबत आहेत. मुली नेहमीच त्यांच्या वॉर्डरोबमध्ये सर्व प्रकारचे स्टायलिश कलेक्शन (Stylish collection) ठेवतात. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच काही स्‍टाईलबद्दल सांगणार आहोत, जे फॉलो केल्‍याने तुम्‍ही स्‍टाइलच्‍या बाबतीत सर्वांवर मात कराल.

असा दया स्टायलिश लूक

जर तुम्हाला खरच स्टायलिश दिसायला आवडत असेल तर तुम्ही नवनवीन प्रयोग करत राहायला हवे. आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमची स्टाइल अधिक चांगली होईल. या युक्त्या केव्हाही फॉलो करून तुम्ही तुमच्या सिंपल लूकला असा स्टायलिश लूक सहज देऊ शकता की सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळतील.

वेस्टर्न ड्रेस

आजकाल प्रत्येक मुलीला वेस्टर्न ड्रेस घालायला आवडतो. पण जर तुम्ही साधा ड्रेस कॅरी करत असाल आणि त्यात स्टाइल हवी असेल तर त्यासोबत बेल्ट वापरा. बॉडीकॉन किंवा मॅक्सी ड्रेससह वेगवेगळ्या स्टाइलचे बेल्ट वापरून तुम्ही स्टाइल मिळवू शकता.

शॉर्ट्सवर लांब शॅग

मुलींना बर्‍याचदा शॉर्ट्स आणि टी-शर्ट घालणे आवडते, उन्हाळ्याच्या हंगामात हा एक अतिशय आरामदायक पोशाख असतो. याला अधिक ट्रेंडी करणारी गोष्ट म्हणजे शॅग. तुम्ही तुमच्या टी-शर्टशी जुळणारा शर्ट कॅरी करू शकता. किंवा कोणत्याही प्रकारचे लांब शॅग तुम्हाला पूर्ण स्टाईल देईल.

कलरफूल ट्राउझर्स

ऑफिसमध्ये कूल लुक मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या रंगांची ट्राउझर्स कॅरी करू शकता. आजकाल अशी अनेक पँट आहेत, जी प्लाझो लूकची आहेत, ती दिसायला स्टायलिश आहेत जितकी ती घालायला आरामदायक आहेत. तुम्ही यासोबत शर्ट, टॉप, टी-शर्ट किंवा अगदी कुर्ती असे काहीही ट्राय करू शकता.

जॅकेट्स

मस्त दिसण्यासाठी आजकाल बाजारात अनेक प्रकारची जॅकेट्स उपलब्ध आहेत. जे तुम्हाला सामान्यतः क्लासी लुक देते ते म्हणजे डेनिम जॅकेट. तुम्ही हे जॅकेट कोणत्याही कुर्ती, टॉप, शर्टसोबत कधीही कॅरी करू शकता. उन्हाळा असो की हिवाळा, प्रत्येक हवामानात या जॅकेटला प्राधान्य दिले जाते.

मॅचिंग जीन्स

कॅज्युअल्ससह स्टायलिश लूक कसा मिळवायचा हा प्रत्येकाला पडणारा प्रश्न असतो. अशा परिस्थितीत स्टाइल मिळवण्यासाठी मॅचिंग जीन्स वापरून पहा. जर तुम्ही या जीन्स कोणत्याही प्रकारच्या बॉडीकॉन टॉपसह कॅरी केल्यात तर तुम्ही अगदी कमाल दिसाल. तुम्ही ब्रॅलेट किंवा क्रॉप टॉप मॅचिंग जीन्ससोबत कॅरी करू शकता.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.