Gold Price Forecast : नणंदेची इच्छा पूर्ण होणार की वन्संची? सोनं स्वस्त होणार की महागणार? 6 महिन्यात मोठा भूकंप?

गेल्या एक-दोन महिन्यांपासून सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून नोव्हेंबरमध्ये MCX वर सोनं सुमारे 13 टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. सध्या सोनं 1.20 लाख ते 1.30 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दरम्यान ट्रेड करत असल्याने ते 1 लाखाच्या खाली जाणार का, अशी चर्चा रंगली आहे. मात्र, सोन्याचे दर 1 लाखाच्या खाली जाण्याची शक्यता नसल्याचे बाजार तज्ज्ञांचे मत आहे.

| Updated on: Nov 29, 2026 | 11:40 PM
1 / 7
गेल्या एक दोन महिन्यांपासून सोन्याच्या भावात प्रचंड घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. तर ग्राहकांची चांदी झाली आहे. मात्र, नोव्हेंबरच्या अखेरीस सोन्याच्या भावात चढउतार पाहायला मिळाला आहे. त्यामुळे पुढच्या काळात सोन्याचा भाव काय असेल? याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

गेल्या एक दोन महिन्यांपासून सोन्याच्या भावात प्रचंड घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. तर ग्राहकांची चांदी झाली आहे. मात्र, नोव्हेंबरच्या अखेरीस सोन्याच्या भावात चढउतार पाहायला मिळाला आहे. त्यामुळे पुढच्या काळात सोन्याचा भाव काय असेल? याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

2 / 7

सध्या सोनं 1 लाख 20 हजार ते 1 लाख 30 हजाराच्या दरम्यान ट्रेंड करत आहे. त्यामुळे सोनं 1 लाख प्रति 10 ग्रॅमच्या खाली जाणार का? अशी चर्चा रंगली आहे. याबाबत कमोडीटी मार्टेकवर नजर ठेवून असलेल्या एक्सपर्टना काय वाटतं? हे महत्त्वाचं आहे.

3 / 7

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर नोव्हेंबरमध्ये सोन्याचा भाव सुमारे 13 टक्क्याने घसरला आहे. अमेरिकन डॉलरची मजबुती, बॉन्ड यील्डमध्ये वाढ आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरात अजून वाढ करण्याची शक्यता यामुळे सोन्याचे दर घसरले आहेत.

4 / 7

एमसीएक्सवर डिसेंबर कॉन्ट्रॅक्टवालं सोनं 26 नोव्हेंबर रोजी घसरून 1,17,906 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेलं होतं. त्यानंतर सोन्याच्या भावात नंतर तेजी आली होती. ट्रेंडिंग सत्रात सोन्याचे भाव 8,345 रुपयाने इंट्रा-डे लेव्हल्सवर गेले होते.

5 / 7

SEBI रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट अनुज गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचे भाव 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम स्तरावर जाण्याची शक्यता नाही. त्यांच्या मते, अमेरिकन अर्थव्यवस्थेशी संबंधित सर्व संकेत आणि फेडरल रिझर्व्हकडून वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीत व्याज दरात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोनं वधारण्याची शक्यता आहे.

6 / 7

अमेरिकेत बेरोजगारी भत्त्यासाठीचे नवीन दावे अपेक्षेपेक्षा कमी आले आहेत. त्याशिवाय घरांच्या विक्रीतही चांगली वाढ नोंदवली गेली आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचे हे संकेत आहेत. तसेच व्याज दरात घट होण्याची शक्यता असल्याने सोन्याचे भाव आगामी काळात घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्यात दीर्घकाळ तेजी येण्याची शक्यता आहे, असं गुप्ता यांचं म्हणणं आहे.

7 / 7

पीएल कॅपिटलचे हेड ऑफ कमोडिटीज आशिष राजोडिया यांनीही यावर भाष्य केलं. सोनं आणि चांदीत सर्वाधिक घट झाल्यानंतर आता स्थिरता येत आहे. येत्या सहा महिन्यात सोन्याचे भाव एका मर्यादित कक्षेत राहणार आहेत. येत्या सहा महिन्यात एमसीएक्सवर सोन्याचे भाव सुमारे 1,12,000 ते 1,35,000 रुपये प्रति 10 ग्रॅम राहील, असं राजोडिया यांना वाटतंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us