Father Day Gift Idea : कमी बजेटमध्येही फादर्स डे करा खास सेलिब्रेट, बाबांना द्या या भेटवस्तू

15 जून रोजी फादर्स डे साजरा केला जाईल. या दिवशी मुले त्यांच्या वडिलांसाठी खास सरप्राईज प्लॅन करून त्यांना भेटवस्तू देतात. जर तुम्हालाही तुमच्या वडिलांना भेटवस्तू द्यायची असेल, तर आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम भेटवस्तूंच्या आयडिया घेऊन आलो आहोत. जे कमी पैशात तुम्ही तुमच्या वडिलांना खास वाटण्यासाठी भेटवस्तू देऊ शकतात.

Father Day Gift Idea : कमी बजेटमध्येही फादर्स डे करा खास सेलिब्रेट, बाबांना द्या या भेटवस्तू
फादर्स डे
| Edited By: | Updated on: Jun 15, 2025 | 2:08 PM

दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यावेळी फादर्स डे 15 जून रोजी साजरा केला जाईल. फादर्स डेचा खरा अर्थ म्हणजे तुमच्या वडिलांना तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता आणि त्यांच्या प्रत्येक त्यागाची कदर करता हे जाणवून देणे. या प्रसंगी तुम्ही त्यांना काही सुंदर आणि खास भेट देखील देऊ शकता.

आता भेटवस्तू महागडी असायलाच हवी असे नाही, तर खऱ्या भावनेने दिलेली छोटी भेट वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकते. जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही तुमच्या वडिलांना या काही छोट्या भेटवस्तू देखील देऊ शकता. चला जाणून घेऊया अशा परवडणाऱ्या आणि उपयुक्त भेटवस्तूंबद्दल जे फादर्स डेला आणखी खास बनवतील.

फादर्स डे साठी कमी किमतीत परवडणाऱ्या भेटवस्तू

हँडमेड कार्ड किंवा पत्र

तुम्ही तुमच्या वडिलांना हाताने बनवलेले एक छान असे कार्ड किंवा पत्र देऊ शकता. या कार्डमध्ये तुमच्या मनातील भावना लिहा ज्या तुम्ही आतापर्यंत त्यांना सांगू शकला नाही आहात. किंवा तुम्ही त्यांची प्रशंसा देखील करू शकता. तुमच्या वडिलांना हाताने बनवलेले कार्ड फादर्स डे च्या निमित्ताने दिल्यास नक्कीच आवडेल.

फोटो फ्रेम किंवा कोलाज

तुम्ही तुमचे आणि तुमच्या वडिलांचे जुने फोटो फ्रेममध्ये ठेवून त्यांना भेट करू शकता. किंवा तुम्ही स्वतः एक फोटो कोलाज बनवू शकता. या जुन्या आठवणी पाहून तुमच्या वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य येईल.

पर्सनलाइज्ड कॉफी मग किंवा कुशन

तुम्ही ऑनलाइन किंवा बाजारातून पर्सनलाइज्ड कॉफी मग किंवा कुशनवर बेस्ट डॅड किंवा त्यांचा फोटो छापून अशी एक भेटवस्तू देऊ शकता. हे स्वस्त असेल आणि तुमच्या वडीलांनाही खास वाटेल.

एक पाकीट भेट द्या

जर तुमचे वडील बऱ्याच काळापासून तेच पाकीट वापरत असतील, तर तुम्ही त्यांना या फादर्स डे ला एक सुंदर पाकीट भेट देऊ शकता. ते त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल आणि ते पाहिल्यावर त्यांना तुमची आठवण येईल.

बेल्ट हा देखील एक चांगला पर्याय आहे

वडिलांना भेट देण्यासाठी चांगल्या दर्जाचा बेल्ट हा देखील एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला तो खूप कमी किमतीत मिळेल आणि तो वडिलांसाठी उपयुक्त ठरेल. अन्यथा तुम्ही त्यांना पेन देखील भेट देऊ शकता. ही देखील एक स्वस्त आणि उपयुक्त भेट आहे.

फादर्स डे कसा सुरू झाला?

अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये फादर्स डेची सुरुवात झाली. वॉशिंग्टनमध्ये सोनोरा स्मार्ट डोड नावाची एक मुलगी होती, जिने तिच्या वडिलांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला. सोनोराच्या आईचे खूप पूर्वी निधन झाले होते आणि त्यानंतर तिच्या वडिलांनी त्यांच्या ६ मुलांना एकट्याने वाढवले. जेव्हा तिने मदर्स डेबद्दल ऐकले तेव्हा तिला वाटले की वडिलांसाठीही असाच एक दिवस असावा.

1910 मध्ये पहिल्यांदाच फादर्स डे साजरा करण्यात आला आणि हळूहळू ही परंपरा अमेरिकेतून संपूर्ण जगात पसरली. वेगवेगळ्या देशांमध्ये हा दिवस वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो, परंतु भारतासह अनेक देशांमध्ये तो जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. आज फादर्स डे हा वडील आणि मुलामधील मौल्यवान नात्याचा सन्मान करण्याचा दिवस बनला आहे.