नवरा बायकोच्या नात्यात या पाच सिमारेषा अवश्य आखा, नात्यातला गोडवा टिकून राहील

प्रत्त्येक नात्यात काही सिमारेषा आखणं आवश्यक असतं. ज्या नात्यात कुणा एकाचेच मत चालत असेल असं नातं फार काळ टिकणं शक्य नाही. नात्यातला गोडवा हरवतो आणि कटकट, वैताग वाढतो. याचा परिणाम मानसिकतेवरच नाही तर शरीरावरही होतो. खाली दिलेल्या 'रिलेशनशीप बॉउंड्रीज' या नात्यातला गोडवा वाढवण्यासाठी उपयोगी ठरतील.

नवरा बायकोच्या नात्यात या पाच सिमारेषा अवश्य आखा, नात्यातला गोडवा टिकून राहील
नात्यात गोडवा टिकवण्यासाठी काय करावे?
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 27, 2023 | 3:33 PM

मुंबई : एकट्याने आयुष्य जगण हे फार कठीण असतं असं आपण बऱ्याचदा बोलतो. त्यामुळेत आपल्याकडे विवाह (Relation Tips) संस्थेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मुलगा मुलगी लग्नाच्या वयात आले की घरची मोठी मंडळी त्यांच्या लग्नाच्या बाबतीत चर्चा सुरू करतात, कारण त्यांनी चार उन्हाळे पावसाळे पाहिलेले असतात. जीवन जगण्यासाठी जोडीदार किती महत्त्वाचा असतो याची त्यांना अनुभूती असते. एखादे नाते जुळणे जितके महत्त्वाचे असते तीतकेच ते टिकणे देखील महत्त्वाचे आहे. नाते टिवण्यासाठी पुढाकार घेणारे सध्याच्या काळात फार कमी झाले आहे. नात्यातला ‘इगो फॅक्टर’ हा एखादी वाळवी लागल्यासारखे नात्याला पोखरत जातो आणि अनेक जण घटस्फोटाच्या किंवा नातं तोडण्याच्या उंबरठ्यावर येऊन थांबतात.

समुपदेशक शितल देशमुख यांच्या मते हे सगळ टाळता येणं शक्य आहे. प्रत्त्येक नात्याला त्याच्या सिमारेषा म्हणजेच रिलेशनशीप बॉन्ड्रीज असतात. त्या जपण फार महत्त्वाचं आहे. आज आपण अशाच पाच सिमारेषांवर आणि नात्यातल्या काही नाजुक घटकांवर प्रकाश टाकूया.

नात्यात या पाच सिमारेषा अवश्य आखा

  1. शारीरिक सिमारेषा- आपण जेव्हा एखाद्यासोबत नात्यात असतो मग ते नाते नवरा बायकोचे असो किंवा प्रियकर आणि प्रेयसीचे असो त्याच्या काही मर्यादा आहे. प्रत्त्येक नात्याचे काही बेसीक नियम आहेत ते पाळले जाणं फार महत्त्वाचं आहे. त्याच पैकी एक म्हणजे एकमेकांसाठी शारीरिक सिमारेषा म्हणजेच फिजीकल बॉन्ड्रीज आखणे फार आवश्यक आहे. जर एखादा पार्टनर स्वतःसाठी वयक्तीक वेळ घालण्याची इच्छा बोलून दाखवतोय तर त्या मताचा आदर करा. यामुळे  तुमच्या नात्यातला गोडवा टिकून राहिल.
  2. भावनिक सीमा- प्रत्येक व्यक्तीची पार्श्वभूमी, संगोपन आणि अनुभव वेगळे असतात. त्याचप्रमाणे, प्रत्येक व्यक्तीची भावना दर्शवण्याची पद्धत देखील खूप वेगळी आहे. अशा परिस्थितीत एकमेकांच्या भावना, गोपनीयता आणि भावनांचा आदर करणे महत्त्वाचे आहे. भावनांवरून आपसात भांडू नका.
  3.  

    लैंगिक सीमा- कोणत्याही नातेसंबंधात निरोगी आणि सहमतीपूर्ण लैंगिक सीमा असणे खूप महत्वाचे आहे. जोडीदाराला सुरक्षित वाटण्यासाठी नातेसंबंधात संवाद, संमती आणि लैंगिक सीमा असणे अत्यंत आवश्यक आहे.

  4.  

    डिजिटल सीमा – लोकं शारीरिकदृष्ट्या कसे एकत्र असतात परंतु भावनिक आणि मानसिकदृष्ट्या कसे वेगळे असतात याबद्दल आपण बरेच काही ऐकले आहे आणि याचे एक कारण डिजिटलायझेशन आहे. कोणत्याही नातेसंबंधात, तंत्रज्ञानाच्या वापराबाबत तुम्ही काही सीमा निश्चित करणे महत्त्वाचे आहे. याव्यतिरिक्त, भागीदारांनी एकमेकांच्या वैयक्तिक डिजिटल जागेत हस्तक्षेप करू नये हे देखील महत्त्वाचे आहे.

     

  5. संभाषण सीमा- नातेसंबंधातील अस्वस्थ संवादासाठी स्वत: ला तयार करा. कठीण विषय, भावना आणि परिस्थिती भागीदारांमध्ये चर्चा केली जाऊ शकते. तुम्ही न थांबता किंवा व्यत्यय न आणता एकमेकांचे लक्षपूर्वक ऐकणे महत्त्वाचे आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)