फक्त लाल आणि हिरवाच नाही तर फुड पॅकेजवर असतात 5 वेगवेगळ्या रंगांचे चिन्हं, जाणून घ्या अर्थ

तुम्ही अनेकदा फुड पॅकेजवर हिरव्या आणि लाल म्हणजेच व्हेज व नॉनव्हेज रंगाचे चिन्हं पाहिलेच असतील, पण या चिन्हांव्यतिरिक्त तुम्ही पॅकेजवर आणखीन 5 वेगवेगळे रंग असतात. चला तर मग त्या रंगाचा चिन्हांचा अर्थ जाणून घेऊयात...

फक्त लाल आणि हिरवाच नाही तर फुड पॅकेजवर असतात 5 वेगवेगळ्या रंगांचे चिन्हं, जाणून घ्या अर्थ
food packet color code
| Edited By: | Updated on: Jul 23, 2025 | 4:28 PM

आपल्या भारतात पदार्थांचे खूप वेगळे पर्याय उपलब्ध आहेत. अशातच लोकं ही दोन पद्धतींचा आहार घेतात. यामध्ये काहीजण हे शुद्ध शाकाहारी आहार घेतात, तर काही मांसाहारी घेतात. काही लोक मांसाहार करत नाहीत पण अंडी खातात, तर आता बरेच लोकं पूर्णपणे व्हेगन झाले आहेत – म्हणजे दूध नाही, तूप नाही, अंडी नाही, फक्त पूर्णपणे वनस्पती-आधारित आहार घेतात.

म्हणूनच, आपण जे काही पदार्थ खातो त्याबद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. अशातच तुम्ही काळजीपूर्वक पाहिले तर प्रत्येक अन्नपदार्थाच्या पॅकेटवर एक लहान रंगीत खूण असते. जसे की कधी हिरवी, कधी लाल, कधी पिवळी, निळी किंवा काळी.

तर आजच्या या लेखात आपण हे जाणून घेणार आहोत की पॅकेटवर असलेले एक लहान रंगीत खूण केवळ डिझाइनचा एक भाग नाहीत तर ते तुमच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाची माहिती देतात. या रंगांचा अर्थ काय आहे आणि काळ्या खुणांबाबत तुम्ही विशेषतः सावध का असले पाहिजे याबद्दल जाणून घेऊयात…

हिरव्या आणि लाल रंगाच्या खुणा

पदार्थांच्या पॅकेटवर असलेला हिरवा रंग हे दर्शवते की हे पदार्थ पूर्णपणे शाकाहारी आहे. म्हणजेच, त्यात कोणतेही मांस, अंडी किंवा इतर कोणतेही प्राणीजन्य गोष्टींचा वापर केलेला नाही.

तर यात लाल रंगाचे चिन्ह हे सूचित करते की हे पदार्थ पुर्णपणे मांसाहारी आहे. जर तुम्ही शाकाहारी असाल तर याकडे विशेष लक्ष द्या.
आतापर्यंत प्रत्येकाला लाल आणि हिरवा रंग असलेल्या चिन्हा बद्दल माहिती होती. मात्र हे रंगाचे चिन्ह एवढेच नाहीये तर आणखीन आहेत.

आता इतर रंगांचा अर्थ जाणून घ्या

1. निळ्या रंगाचे चिन्ह हे सांगते की उत्पादन औषधाशी संबंधित आहे. याचा अर्थ असा की ते वैद्यकीय स्थितीसाठी वापरले जाऊ शकते आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ते वापरू नका.

2. पिवळा रंग असलेले चिन्ह हे पॅकेज फुडमध्ये अंड्याचा वापर केलेला असल्याचे सुचित करते. त्यामुळे जी लोकं अंडी खात नाहीत, अशा लोकांसाठी ही माहिती खूप महत्वाची आहे.

3. काळे डाग

जर अन्नाच्या पॅकेटवर काळे डाग असेल तर ते त्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर करण्यात आलेला आहे. हे पदार्थ चव वाढवण्यासाठी, रंग टिकून राहण्यासाठी किंवा ते जास्त काळ खराब होऊ नये म्हणून जोडले जातात, परंतु मोठ्या प्रमाणात ते आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतात.

तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की काळे डाग असलेल्या उत्पादनांचे जास्त सेवन केल्याने पचनसंस्था, यकृत आणि मूत्रपिंडांवर परिणाम होऊ शकतो. त्यांचा आहारात दीर्घकाळ समावेश केल्यानेही आजारांचा धोका अनेक पटींनी वाढू शकतो.

काय करायचं?

  • प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही पॅक केलेले पदार्थ खरेदी करता तेव्हा पॅकेटवरील रंगीत खुणा पहा.
  • मुलांच्या स्नॅक्स, नमकीन पदार्थ, गोड आणि पॅकेज्ड पदार्थांवर काळे डाग जास्त दिसतात . तर हे पदार्थ नियमितपणे देणे टाळा.
  • जर एखाद्या उत्पादनावर काळे डाग असतील तर ते खरेदी न करणे किंवा ते खूप कमी प्रमाणात वापरावे.
  • पदार्थांच्या पाकिटांवर असलेल्या छोट्या रंगीत खुणा तुमच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी आहेत. त्यामुळे तुमच्या आवडी आणि गरजांनुसार योग्य निवड करण्यास ते मदत करतात. तर आता बाजारातुन पदार्थ हे चव किंवा ब्रँड पाहून खरेदी करू नका, तर त्याच्या रंगांची भाषा देखील समजून घ्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)