AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात तजेलदार चेहरा पाहिजे? मग अशा प्रकारे तयार करा पुदीना फेस पॅक

पुदीन्याची पाने अन्नाचे पचन करण्यासाठी प्रभावी आहे. यासह, हे पोटात होणार्‍या बर्‍याच समस्यांवर उपचार करण्यासाठी देखील उपयुक्त ठरते.

उन्हाळ्यात तजेलदार चेहरा पाहिजे? मग अशा प्रकारे तयार करा पुदीना फेस पॅक
सुंदर त्वचा
| Updated on: Mar 29, 2021 | 12:29 PM
Share

मुंबई : पुदीन्याची पाने अन्नाचे पचन करण्यासाठी प्रभावी आहे. यासह, हे पोटात होणार्‍या बर्‍याच समस्यांवर उपचार करण्यासाठी देखील उपयुक्त ठरते. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? उन्हाळ्यात त्वचेसाठी पुदीनाचा फेस पॅक अत्यंत चांगला आहे. या फेस पॅकमुळे तुम्हाला ताजेपणा वाटेल. उन्हाळ्याच्या दिवसात बाहेरून आल्यावर चेहरा थकल्यासारखा वाटतो त्यावेळी पुदीनाचा फेस पॅक लावल्यावर तुमची त्वचा तजेलदार होईल. (Follow these tips to create a cool mint face pack)

-10 ते 15 पुदीनाची पाने घ्या आणि ती व्यवस्थित धुवा आणि दह्यामध्ये बारीक करून घ्या. ही पेस्ट एकदम बारीक झाली पाहिजे. पुदिना आणि दह्याच्या पेस्टमध्ये एक चमचा चंदन पावडर घाला. आता हा पॅक 20 ते 25 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा धुवा. या फेस पॅकमुळे आपली त्वचा निरोगी, थंड आणि निरोगी ठेवण्यास मदत होईल.

-पुदीनाची पाने घ्या आणि त्यामध्ये काकडी घाला हे बारीक करून घ्या मग हे मिश्रण आपल्या चेहऱ्याला लावा साधारण 20 ते 25 मिनिटे हे मिश्रण आपल्या चेहऱ्याला लावून ठेवा. मग तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल. पुदीन्याच्या पानांमध्ये मेन्थॉल, प्रथिने, चरबी, कर्बोदके, व्हिटामिन-ए, राइबोफ्लेविन, तांबे आणि लोह आढळतात. या पानांच्या सेवनाने उलट्या रोखता येतात आणि पोटातील गॅस देखील काढून टाकता येतो. तसेच, साठलेल्या कफावर देखील पुदिना उपयुक्त आहे.

-पुदीना गरम प्रभावाचा आहे, ज्यामुळे तो शरीरातून घाम काढून ताप काढून टाकतो. आपल्याला एखादा किडा चावल्यास, त्याचे विष काढून करण्याचे गुणधर्म देखील पुदीन्यामध्ये आहेत. पुदीनाच्या पानांची पेस्ट तयार करा आणि त्याला हलके गरम करून, ती कोणत्याही प्रकारच्या जखमेवर किंवा कीटकांच्या चाव्यावर लावा. यामुळे जखम आणि कीटकांच्या चाव्यापासून आराम मिळतो. यासह, यामुळे होणारी वेदना आणि सूज देखील कमी होते.

संबंधित बातम्या : 

Turmeric Side Effects | पोटाच्या समस्यांपासून ते मुतखड्यापर्यंत, ‘हळदी’च्या अतिसेवनाने होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम!

Health Care | हवामान बदलतंय! अशाप्रकारे घ्या आपल्या आरोग्याची काळजी

(Follow these tips to create a cool mint face pack)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली