AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात हवी असेल टवटवीत त्वचा तर फॉलो करा ‘हे’ स्किन केअर रुटीन

ऋतूनुसार स्किनकेअर रूटीन देखील बदलणे आवश्यक आहे. वसंत ऋतूमध्ये त्वचेची खास काळजी कशी घ्यावी हे जाणून घ्या. यासाठी तुम्ही येथे दिलेल्या स्किनकेअर रूटीनचे पालन देखील करू शकता.

उन्हाळ्यात हवी असेल टवटवीत त्वचा तर फॉलो करा 'हे' स्किन केअर रुटीन
Image Credit source: Freepik
| Updated on: Feb 25, 2023 | 8:22 AM
Share

नवी दिल्ली : हवामानात बदल होत असताना आपल्या आरोग्यासोबतच त्वचेचीही (skin care) विशेष काळजी घ्यावी लागते. या दरम्यान, स्किनकेअर रुटीनमध्ये बदल करणे देखील आवश्यक आहे. त्वचेचे रुटीन (skin care routine) बदलल्याने त्वचा निरोगी ठेवण्यास मदत होते. त्याच्या मदतीने तुम्ही पिंपल्स, डाग आणि टॅनिंग (tanning) यासारख्या त्वचेशी संबंधित समस्यांपासून स्वतःला वाचवू शकता. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते. याचे पालन करून तुम्ही त्वचेला हानिकारक अतिनील किरणांपासून वाचवू शकता. तसेच त्वचा चमकदार आणि निरोगी राहण्यास मदत होईल. वसंत ऋतूमध्ये त्वचेसाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे स्किन रूटीन फॉलो करू शकता ते जाणून घेऊया.

मॉयश्चरायजर

तुमची त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी मॉयश्चरायजरचा अवश्य वापर करावा. ऋतूनुसार त्वचेसाठी मॉयश्चरायजर निवडा. तेलकट त्वचा असलेले लोक जेल-आधारित मॉयश्चरायजर वापरू शकतात.

एक्सफोलिएट करा

धूळ आणि प्रदूषणामुळे आपल्या त्वचेवर टॅन जमा होते. अशा परिस्थितीत त्वचेला एक्सफोलिएट करणं खूप गरजेचं आहे. तुमची त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी तुम्ही होममेड मॉयश्चरायजर देखील वापरू शकता. हे तुमच्या त्वचेची छिद्र खोलवर स्वच्छ करण्यास मदत करते. यामुळे छिद्रे उघडतात. त्वचा हायड्रेटेड राहते. मात्र यासाठी केवळ बाजारात मिळणारी केमिकलयुक्त उत्पादने वापरण्याची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी काही स्क्रब तयार करूनही त्वचेसाठी वापरू शकता.

सनस्क्रीन

सूर्याची हानिकारक अतिनील किरणे आपल्या त्वचेला हानी पोहोचवण्याचे काम करतात. अशा परिस्थितीत त्वचेसाठी सनस्क्रीन वापरणे महत्त्वाचे आहे. उन्हाळा असो किंवा पावसाळा अथवा हिवाळा, प्रत्येक ऋतूमध्ये सनस्क्रीन वापरणे अत्यावश्यक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात सूर्याच्या प्रखर किरणांपासून बचाव करण्यासाठी घराबाहेर पडताना किंवा घरातही अंघोळीनंतर योग्य सनस्क्रीन लावणे महत्वाचे ठरते. यामुळे आपली त्वचा टॅन होण्यापासून वाचवण्यास मदत होते.

हलकी सौंदर्य उत्पादने (light for skin) 

वसंत ऋतूमध्ये त्वचेसाठी हलकी सौंदर्य उत्पादने वापरा. यामुळे त्वचा फ्रेश दिसते. जड ब्युटी प्रोडक्ट्स वापरल्याने तुमच्या त्वचेची छिद्रे बंद होतात. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी हलक्या सौंदर्य उत्पादनांचा वापर करावा.

फेस पॅक

उन्हाळ्यात त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी तुम्ही फेस पॅक देखील वापरू शकता. तुम्ही घरच्या घरी काही फेस पॅक तयार करून वापरू शकता. मुलतानी माती, बेसन आणि चंदन इत्यादी घटक इतर घटकांसह मिक्स करून घरगुती फेस पॅक बनवू शकता. यामुळे त्वचेची छिद्र उघडण्यास मदत होते व ती स्वच्छ राहतात. यामुळे मुरुम आणि त्वचेशी संबंधित समस्यांचा त्रास कमी होतो.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.