तुम्हालाही भूत पहाण्याची इच्छा आहे का? तर या 6 भूतिया ठिकाणांवर घोस्ट टूर नक्की करा
न्यूझीलंड, एडिनबर्ग आणि इतर ठिकाणी पर्यटक भूतांचा अनुभव घेण्यासाठी 'घोस्ट टूर' वर जात असतात. या टुरची लोकप्रियता आता अनेक देशांमध्ये वाढली आहे. लोक भूतिया ठिकाणांवर जाऊन रहस्य मय अनुभव घेत असतात. चला, जाणून घेऊया या देशाचे पर्यटकांचा वेगवेगळा अनुभव.

आजकाल अनेक लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे “खरच भूत असतात का? आणि असले तर ते कसे दिसतात?” या प्रशांचे उत्तर शोधण्यासाठी अनेक लोक भुतांच्या ठिकाणी जाऊन ते पाहण्याची इच्छा व्यक्त करतात. अशा ठिकाणांवर जाण्यासाठी अनेक देशांमध्ये ‘घोस्ट टूर’ म्हणजेच भुतांच्या ठिकाणांची टूर करणे लोकप्रिय होत आहे. चला, जाणून घेऊया या देशाचे पर्यटक कोणत्या भूतिच्या ठिकाणांवर टूर करतात.
1. युनायटेड किंगडममधील भुताची ठिकाणे: युनायटेड किंगडम मध्ये अनेक भुताची ठिकाणे आहेत जिथे पर्यटक भूत पाहण्यासाठी येतात. लंडन पासून एक तासाच्या अंतरावर असलेल्या प्लकली या गावाला खूप भयानक मानले जाते. येथे हजारो लोकांची हत्या झाली आहे आणि लोकांचे मानणे आहे की त्याच लोकांची आत्मा या गावात भटकत असते. येथे लोकांना अनेक वेळा भूत दिसले किंवा त्यांचे भयानक आवाज ऐकायला आले आहेत.
2. एडिनबर्ग, स्कॉटलँड: स्कॉटलँडची राजधानी एडिनबर्ग ही भुतांचे शहर म्हणून ओळखली जाते. येथे २५ डॉलर पासून घोस्ट टूर सुरू होतात. येथे असलेल्या एडिनबर्ग कॅसलला सर्वात भयानक किल्ला मानले जाते. येथे कब्रस्तानांवर देखील रात्री घोस्ट टूर आयोजित केले जातात.
3. न्यूझीलंड: न्यूझीलंडमधील संसद ही भुताचे ठिकाण मानली जाते. येथे दर गुरवारी घोस्ट टूर आयोजित केले जातात. न्यूझीलंडमधील प्रसिद्ध लायब्ररीला भुतांचे ठिकाण मानले जाते, कारण या लाब्ररीला एकदा आग लागली होती आणि म्हणून या ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी रात्री येथे जाण्यापासून घाबरतात.
4. अमेरिका : अमेरिकेतील न्यू ऑरलियन्स शहर अत्यंत भयानक मानले जाते. हे शहर मिसिसिपी नदीच्या काठावर वसले आहे आणि येथे अनेक भयानक घटनांमुळे लोकांमध्ये या ठिकाणा विषयी भीतीचे वातावरण आहे. या शहरात घोस्ट टूर ३० डॉलरपासून सुरू होतात.
5. ऑस्ट्रेलिया: ऑस्ट्रेलियामधील बीचवर्थ चा पागलखाना एक अजब आणि रहस्यमय ठिकाण आहे. येथे १०,००० पेक्षा जास्त लोकांचे मृत्यू झाले असून त्यांचा आत्मा अजूनही या ठिकाणी भटकत असल्याचे मानले जाते. येथे संध्याकाळी अनेक विचित्र घटना घडतात.
6. पॅरिस, फ्रान्स: पॅरिस हे शहर फॅशनसाठी प्रसिद्ध आहे, पण येथे एक ठिकाण आहे जे भुतांसाठी प्रसिद्ध आहे ‘द पॅरिस कॅटकॉम्ब्स’. १७व्या शतकात, पॅरिस मध्ये मृत्यू संख्या खूप वाढली होती आणि कब्रिस्तानात मृत शरीरं दफन करण्यासाठी जागा उरली नव्हती. त्यानंतर अनेक हाडं आणि खोपड्या सडलेल्या शवांपासून बाहेर येत होत्या.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
