केस गळतीमुळे त्रस्त आहात? तर ‘हे’ वाचा !

| Updated on: Mar 18, 2021 | 7:37 AM

आद्रक आपल्या आरोग्यासाठी बरोबरच त्वचा आणि केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे.

केस गळतीमुळे त्रस्त आहात? तर हे वाचा !
Follow us on

मुंबई : आद्रक आपल्या आरोग्याबरोबरच त्वचा आणि केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. आद्रकमध्ये पोटॅशियम, लोह, अँटी-ऑक्सिडंट्स, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यासारखे गुणधर्म आहेत. ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती देखील वाढण्यास मदत होते. आयुर्वेदात आद्रकाचे वर्णन अत्यंत उपयुक्त घटक असे आहे. शतकानुशतके आद्रकाच्या चहाचे सेवन केले जात आहे. (Ginger oil is beneficial for hair)

यात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट, औषधी आणि उपचारात्मक असे बरेच गुणधर्म आहेत. आद्रकामध्ये आढळणारा फायटोन्यूट्रिएंट जिंजरॉल हा प्रमुख घटक निरोगी सूक्ष्मजंतू तयार करतो आणि आपल्या पाचक समस्यांना प्रतिबंधित करतो. तुम्हाला जर केस गळतीची समस्या असेल तर त्यासाठी आद्रक खूप उपयुक्त आहे.

1 चमचा आल्याचा रस

2 चमचे नारळ तेल

2 चमचे एरंडेल तेल

सर्वात अगोदर आद्रक किसून त्याचा रस तयार करा. आपल्याला एकावेळी 1 चमचे आद्रकचा रस लागेल. आता एका भांड्यात नारळ तेल घ्या आणि हे तेल मंद आचेवर हलके गरम करावे. त्यानंतर त्यामध्ये नारळ तेल आणि एरंडेल तेल घाला. पण हे लक्षात ठेवा नारळ तेलामध्ये ज्यावेळी तुम्ही आल्याचा रस आणि एरंडेल तेल घालणार आहात त्यावेळी ते तेल गरम नसले पाहिजे. यानंतर हे तेल केसांना लावा साधारण दोन तासांनंतर केस धुवा.

असे आठवड्यातून किमान दोन वेळा तरी केले पाहिजे. तुम्हाला जर खोकल्याचा त्रास होत असेलतर आद्रकचे साल उन्हात वाळवा आणि मिक्सरमधून काढा आणि त्याची पूड बनवा. जेव्हा जेव्हा खोकल्याची समस्या उद्भते तेव्हा आद्रकाच्या सालची पावडर आणि मध मिक्स करा यामध्ये कोमट टाका. यामुळे तुमचा खोकला जाईल.

संबंधित बातम्या : 

(Ginger oil is beneficial for hair)