AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ginseng Benefits : शतावरीचा औषधी वनस्पती म्हणून प्राचीन काळापासून वापर, काय आहेत फायदे वाचा!

शतावरी ही एक औषधी वनस्पती आहे. त्याची पाने आणि मुळे औषध म्हणून वापरली जातात.

Ginseng Benefits : शतावरीचा औषधी वनस्पती म्हणून प्राचीन काळापासून वापर, काय आहेत फायदे वाचा!
शतावरी वनस्पती
| Updated on: May 31, 2021 | 3:27 PM
Share

मुंबई : शतावरी ही एक औषधी वनस्पती आहे. त्याची पाने आणि मुळे औषध म्हणून वापरली जातात. शतावरी ही औषधी वनस्पती बऱ्याच औषधांमध्ये वापरली जाते. शतावरी ही वनस्पती आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप महत्वाची आहे. विशेष म्हणजे शतावरीचा आहारात समावेश केला तर आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढण्यास मदत होते. शतावरीमुळे अनेक रोगांचा समस्या दूर होण्यास मदत होते. (Ginseng is beneficial for boosting the immune system)

तणाव कमी करण्यासाठी – शतावरीमध्ये तणाव कमी करण्याचे गुणधर्म आहेत. हे स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोल करते आणि ग्रंथीला मजबूत करते. यामुळे मानसिक आणि शारीरिक ताणतणाव दूर होण्यास मदत होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते – शतावरी वनस्पती व्हायरल आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका कमी करते. यामुळे सध्याच्या काळात शतावरीचा चहा घेतला पाहिजे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

उच्च रक्तदाब – उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आपण शतावरीचा चहा घेऊ शकतो. उच्च रक्तदाब ग्रस्त लोकांसाठी हे फायदेशीर आहे. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी शतावरीचा चहा हा एक नैसर्गिक घरगुती उपाय आहे.

मधुमेहापासून बचाव – शतावरी आपण रिकाम्या पोटी खाऊ शकतो. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. हे मधुमेह रोखू शकते.

वजन कमी करण्यासाठी – शतावरीमध्ये भूक कमी करण्यासाठी गुणधर्म आहे. तसेच यात कॅलरी प्रमाण खूप कमी असते. आपण शतावरीचा चहा घेऊ शकतो. याशिवाय बारीक करून आपण शतावरीचे पावडर घेऊ शकतो.

त्वचेसाठी फायदेशीर – शतावरीची पाने आणि मुळांमध्ये व्हिटॅमिन, खनिज आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. ते आपली त्वचा निरोगी ठेवतात. यामुळे त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास मदत होते. ते आपली त्वचा हायड्रेटेड आणि त्वचेचा टोन ठेवण्याचे कार्य करते.

केसांसाठी फायदेशीर – शतावरीमध्ये नैसर्गिक कार्बोहायड्रेट असतात. हे केस गळती रोखण्यास मदत करतात. तसेच ज्यांना टक्कल आहे त्यांनी शतावरीचा चहाचा आहारात समावेश केला पाहिजे.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Ginseng is beneficial for boosting the immune system)

म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.