नारळाच्या तेलात ‘या’ 5 गोष्टी मिक्स करा आण‍ि मिळवा चमकदार त्वचा

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही सुद्धा चमकदार त्वचेसाठी काही उपाय करत असताल तर नारळाच्या तेलात या खास गोष्टी मिक्स करून लावल्याने त्वचा हेल्दी आणि चमकदार तसेच मऊ होऊ शकते. जर तुम्हाला तुमची त्वचा आरशासारखी चमकदार करायची असेल तर हे घरगुती उपाय नक्की करून पहा.

नारळाच्या तेलात या 5 गोष्टी मिक्स करा आण‍ि मिळवा चमकदार त्वचा
Image Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Apr 16, 2025 | 10:59 PM

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेच्या काळजीसाठी आपण बाजारात असलेले महागडे प्रॉडक्टचा वापर करत असतो. पण काळातरांने या प्रॉडक्टचा परिणाम कमी होतो. तसेच या प्रॉडक्टमुळे काहीच्या त्वचेवर पुरळ मुरूम यासारख्या समस्या निर्माण होतात. अशातच तुम्ही जर घरगुती उपाय केले तर त्याचे चांगले परिणाम तर त्वचेवर होतातच शिवाय कोणते दुष्परिणाम त्वचेवर होत नाही. यासाठी तुम्ही सुद्धा त्वचेची काळजी घेताना घरगुती नैसर्गिक उपायांचा अवलंब करा. उन्हाळ्याच्या दिवसात स्किन केअर करताना नारळाच्या तेलाचा वापर करा. कारण नारळाच्या तेलात अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म भरपूर असतात जे त्वचेला पोषण देतात आणि ती चमकदार देखील बनवतात. तसेच या तेलाचा वापर आपल्या घरात शतकानुशतके करत आलेले आहेत.

स्किन केअरसाठी तुम्ही जर नारळाच्या तेलात काही घरगुती आणि प्रभावी गोष्टी मिक्स करून त्वचेवर लावल्यास त्याचा परिणाम आणखी आश्चर्यकारक होतो. चला जाणून घेऊया अशा 5 गोष्टींबद्दल, ज्या नारळाच्या तेलात मिसळून लावल्यास त्वचेला
चमक मिळू शकते.

हळद आणि नारळ तेल

हळदीमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही जर नारळाच्या तेलात हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास ते त्वचा खोलवर स्वच्छ करते आणि डाग कमी करते. यासाठी एक चमचा नारळाच्या तेलात चिमूटभर हळद मिसळा आणि चेहऱ्यावर 10-15 मिनिटे लावा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

मध आणि नारळ तेल

सर्वांनाच माहित आहे की मध हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. ते त्वचेला ओलावा देते आणि ती मऊ करते. नारळाच्या तेलात मध समान प्रमाणात मिक्स करून चेहऱ्यावर 15 मिनिटे लावून ठेवा,त्यानंतर कोमट पाण्याने धुवा. मध आणि नारळाचे तेल चेहऱ्यावर लावल्याने मृत त्वचा निघून जाते. चेहऱ्यावरील डाग कमी होतात.

लिंबाचा रस आणि नारळ तेल

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि ब्लीचिंग गुणधर्म असतात, जे त्वचेचा रंग सुधारतात. तुमची त्वचा जर तेलकट असेल आणि त्यावर टॅनिंग किंवा पिग्मेंटेशन असेल तर नारळाच्या तेलाचे काही थेंब लिंबाच्या रसात मिक्स करून लावणे फायदेशीर ठरू शकते. लक्षात ठेवा की लिंबाचा रस आम्लयुक्त असतो, म्हणून तो आठवड्यातून फक्त 1-2 वेळा लावा आणि लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा.

चंदन पावडर आणि नारळ तेल

चंदन पावडर त्वचेला थंडावा देण्यासाठी आणि डाग दूर करण्यासाठी खुप फायदेशीर आहे. नारळाच्या तेलात एक चमचा चंदन पावडर मिसळा आणि पेस्टप्रमाणे चेहऱ्यावर लावा. ते 15-20 मिनिटे तसेच राहू द्या आणि सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. याच्या नियमित वापराने त्वचा उजळते.

कोरफड वेरा जेल आणि नारळ तेल

नारळाचे तेल आणि कोरफड जेल समान प्रमाणात मिसळून त्वचेवर लावल्याने ते खोलवर मॉइश्चरायझ होते, ज्यामुळे चेहरा चमकदार आणि फ्रेश दिसतो. कोरड्या आणि संवेदनशील त्वचेसाठी हे खूप फायदेशीर मानले जाते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)