Hair Care: या भाज्या आणि फळं खाल्ली तर वेगाने वाढतील तुमचे केस

| Updated on: Jan 11, 2023 | 1:54 PM

केसांना खोलवर पोषण देण्यासाठी तुम्ही अनेक फळं व भाज्यांचा आहारात समावेश करू शकता. त्यामुळे केसांची वेगाने वाढ होण्यास मदत होते.

Hair Care: या भाज्या आणि फळं खाल्ली तर वेगाने वाढतील तुमचे केस
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – खराब जीवनशैली, अयोग्य आहार, धूळ आणि प्रदूषण यांचा आपल्या केसांवर (hair problems) खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे केस तुटणे आणि गळणे सुरू होते. केसांची वाढ (hair growth) थांबते. केसांची जलद वाढ व्हावी यासाठी अनेकजण केमिकलयुक्त उत्पादनांचाही (chemical products) वापर करतात. परंतु त्यांचा केसांवर खूप वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत केसांना खोलवर पोषण देण्यासाठी तुम्ही अनेक फळं व भाज्यांचा आहारात समावेश करू शकता. त्यामुळे केसांची वेगाने वाढ होण्यास मदत होते.

भोपळा

भोपळ्यामध्ये लोह आणि बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ई मुबलक प्रमाणात असते. भोपळ्याचे सेवन केल्याने तुमचे केस लवकर वाढण्यास मदत होते.

हे सुद्धा वाचा

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक आणि ब्रोकोलीसारख्या भाज्यांचा समावेश होतो. या भाज्यांमध्ये लोह मुबलक प्रमाणात असते. ते व्हिटॅमिन ए, सी, कॅरोटीन, फोलेट आणि पोटॅशियम सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असतात. त्यांचे सेवन केल्याने केसांचे कूप मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे आपला स्काल्प हायड्रेटेड राहतो .

गाजर

गाजर हे व्हिटॅमिन ए चा उत्तम स्रोत आहे. तुम्ही याचेही सेवन करू शकता. त्यामुळे केस लवकर वाढण्यास मदत होते.

रताळं

रताळं हा बीटा-कॅरोटीनचा उत्कृष्ट स्रोत आहे. केसांच्या आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. हे केस जलद वाढण्यास आणि मजबूत करण्यास मदत करते.

सिमला मिर्ची

सिमला मिरचीमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. हे शरीरात कोलेजनचे उत्पादन वाढवते. त्यामुळे केस मजबूत होण्यास मदत होते.

ॲव्हाकॅडो

ॲव्हाकॅडोमध्ये हेल्दी फॅट असते. यामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. हेअर मास्क म्हणून तुम्ही केसांना ॲव्हाकॅडो देखील लावू शकता. ॲव्हाकॅडो टाळूचे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्याचे काम करते.

केळं

केळ्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वं आणि पोटॅशिअम असते. हे केस तुटणे टाळण्यास मदत करते. तसेच केस दुभंगण्याच्या म्हणजेच स्प्लिट एंड्सच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते. त्यामुळे केसातील कोंडाही कमी होतो.

पपई

पपईमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई असते तसेच अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्मही असतात. तसेच त्यामध्ये अँटी-फंगल गुणही असतात. पपईमुळे कोंड्याची समस्या कमी होते तसेच केसही मुलायम होतात.