
प्रत्येक स्त्रीला आपला संसार सुखाचा व्हावा असं वाटत असतं. त्यासाठी त्या पहिल्या दिवसापासूनच प्रयत्न करत असतात. सासरकडील माणसं वेगवेगळ्या विचाराची असतात. वेगवेगळ्या मानसिकतेची असतात. त्यांना समजून घेण्यात वेळ जातो आणि त्यामुळे चुकांवर चुका होतात. गैरसमज होतात आणि एक प्रतिमा निर्माण होऊन जाते. मग त्यातून बाहेर पडणं मुश्किल होतं. नात्यात खटके उडू लागतात आणि टोकाचे मतभेद निर्माण होण्याची शक्यताही निर्माण होते. या सर्व गोष्टींपासून दूर राहता येते. फक्त रिलेशनशीप कशी मेंटेन करायची हे समजले पाहिजे. तरच सर्व गोष्टी सोप्या होतात.
सध्याच्या काळातील स्त्रियांना लग्नानंतर सासरच्या लोकांशी कसे वागायचे याची समस्या निर्माण होते. सासरी कसं वागायचं हेच नेमकं कळत नसल्याने असंख्य लग्ने मोडली आहेत. नवरा बायकोतील वादाचं कारण जेव्हा घरातील लोक किंवा नातेवाईक होतात तेव्हा असंख्य कुटुंबात तणाव पाहायला मिळतो. हा तणाव कधी नवरा बायकोत दिसून येतो तर कधी आईवडिलांमध्ये दिसून येतो. त्यामुळे सुखी संसारासाठी एक सिंगल रुल असला पाहिजे. तुम्हाला नातं निभावण्यासाठी त्याचा फायदाच होणार आहे.
तो रुल म्हणजे…
रिलेशनशीप कोचने सुखी संसाराचा रुल सांगितला आहे. या रुलमुळे ब्रेकडाऊन होत नाही. रिलेशनशीप कोचने कशा पद्धतीने सासरच्या लोकांशी नातं टिकवलं पाहिजे याचा नियम सांगितला आहे. हा एक सिंगल रुल आहे. तो म्हणजे रिस्पेक्टफुली कम्यूनिकेशन. म्हणजे आदराने वागणं. आदराने संवाद साधणं. कितीही राग आला किंवा दोघांमध्ये कितीही मतभेद झाले तरी सासरच्या लोकांशी प्रेमाने, इज्जतीने संवाद साधावा. कोणताही मुद्दा मांडताना किंवा म्हणणं सांगताना संपूर्ण सन्मानाने आणि टू द पॉईंट सांगावं. न रागावता आणि न आदळपाट करता.
एक क्रॉस लाईन असावी
सासू सासऱ्यांना सुनेसोबत लव्हिंग, केअरिंग होण्यासाठी वेळ लागू शकतो. सूनेबाबतचं ममत्व जागृत होण्यासाठी बराच काळ जाऊ शकतो. अशावेळी सूनेने सासू सासऱ्यांसमोर स्वत:ला योग्य पद्धतीने प्रेझेंट केलं पाहिजे. आपली एक चांगली प्रतिमा निर्माण केली पाहिजे. त्यांच्याशी व्यवस्थित संवाद साधला पाहिजे. टोकाचे मतभेद झाले तरी भावनेच्या किंवा संतापाच्या भरातू तोंडातून अपशब्द उच्चारू नये. नात्यात नेहमी एक लाईन असली पाहिजे आणि ती कधीच क्रॉस करता कामा नये.