पंखा अंगावर पडला तर काय होऊ शकतं? अपघात टाळायचं असेल तर हे नक्की वाचा!

अनेक महिने बंद असलेला पंखा सैल झालेला असू शकतो आणि तो गरगरायला लागल्यावर कधी खाली कोसळेल, याचा नेम नाही! हे वाटतं तितकं साधं नाही, यामुळे घरात गंभीर अपघात होऊ शकतो. दुर्लक्ष करण्याआधी ही माहिती नक्की वाचा!

पंखा अंगावर पडला तर काय होऊ शकतं? अपघात टाळायचं असेल तर हे नक्की वाचा!
Image Credit source: TV9 Network
| Edited By: | Updated on: Apr 24, 2025 | 9:34 AM

उन्हाळ्यात घराघरात गरमीपासून बचाव करण्यासाठी अनेक महिने बंद ठेवलेले पंखे पुन्हा सुरु होतात. पण, पंखा सुरू करण्यापूर्वी त्याची सुरक्षितता तपासणं गरजेते आहे, कारण अनेक महिने बंद राहिल्यानंतर, पंख्यामध्ये तांत्रिक समस्या निर्माण होऊ शकतात, आणि फिटिंग सैल होऊ शकतात. हे दुर्लक्ष करणं घरात मोठ्या अपघाताला कारण ठरू शकतं.

पंखा कोसळण्याचा धोका किती मोठा आहे?

आपल्याला असं वाटू शकतं की पंखा कोसळल्याने फार काही होणार नाही, फक्त किरकोळ दुखापत होईल. पण असं नाही, फिरणारा पंखा धोकादायक असतो. तो कोसळल्यास त्याच्या पातीमुळे गंभीर दुखापत होऊ शकते आणि कधी कधी जीवही गमावला जाऊ शकतो. २०२४ मध्ये बिहारमधील नालंदा जिल्ह्यात असाच एक दुर्दैवी अपघात घडला. रात्री झोपलेल्या महिलेवर पंखा कोसळला आणि तिचा मृत्यू झाला.

पंख्याच्या कोसळण्याचे संकेत

पंखा कोसळण्यापूर्वी काही संकेत दिसू शकतात. या संकेतांकडे लक्ष दिल्यास, अपघात टाळता येऊ शकतो.

1. पंख्यातून अनोळखी आवाज येणे, जसे की घरघर किंवा कटकट आवाज.

2. पंखा डुलत असेल, थरथरत असेल किंवा जास्त हलत असेल.

याचा अर्थ पंख्याच्या फिटिंगमध्ये किंवा बॅलन्सिंगमध्ये काहीतरी समस्या असू शकते. अशा पंख्याखाली वावरणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं.

पंख्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाय

उन्हाळ्यात पंख्यांचा वापर करण्यापूर्वी, त्याची सुरक्षा तपासणे आवश्यक आहे. यासाठी काही उपाय आहेत:

  • व्यावसायिक तपासणी करा: पंख्याची तपासणी अनुभवी इलेक्ट्रिशियनकडून करून घ्या. जर पंखा हिवाळ्यात बंद ठेवला असेल, तर सर्व्हिसिंग आवश्यक असू शकते.
  • फिटिंग तपासा: पंखा छताला घट्ट बसवला आहे का, त्याचे स्क्रू किंवा नट-बोल्ट सैल नाहीत ना, याची खात्री करा.
  • संकेतांकडे लक्ष द्या: पंख्यातून आवाज येत असेल किंवा तो हलत असेल, तर लगेच दुरुस्ती करा आणि वापर थांबवा.

तुम्ही पंख्याचा वापर सुरक्षितपणे करायला हवा, अन्यथा तुमच्या घरात मोठा धोका निर्माण होऊ शकतो. पंख्याची नियमित तपासणी करा आणि योग्य देखभाल करा, जेणेकरून तुम्ही आणि तुमचे कुटुंब सुरक्षित राहू शकाल.