Banana | थंडीच्या दिवसांत केळी खाणं टाळताय? थांबा, आधी ‘हे’ फायदे वाचा…

Banana | थंडीच्या दिवसांत केळी खाणं टाळताय? थांबा, आधी ‘हे’ फायदे वाचा...
केळी

हिवाळ्याच्या हंगामात काय खावे आणि काय खाऊ नये, हा प्रश्न बर्‍याच लोकांच्या मनात नेहमी असतो. अनेक लोक हिवाळ्यात केळी खाणे टाळतात.

Harshada Bhirvandekar

|

Jan 18, 2021 | 1:59 PM

मुंबई : हिवाळ्याच्या हंगामात काय खावे आणि काय खाऊ नये, हा प्रश्न बर्‍याच लोकांच्या मनात नेहमी असतो. अनेक लोक हिवाळ्यात केळी खाणे टाळतात. मात्र, हिवाळ्यामध्ये केळी खायला पाहिजे, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सर्दी-खोकला झाल्यावर लोक पहिला केळी खाणे बंद करतात. अनेकांना आरोग्याच्या समस्यांमुळे केळी खाणे वर्ज्य असते (Health Benefits of Banana during winter season).

त्यांना असे वाटते की, केळी खाण्यास सर्दी बरा होण्यास वेळ लागतो किंवा केळी खाल्ल्याने सर्दीची समस्या आणखी गंभीर होते. परंतु, केळी पोटॅशियमने समृद्ध आहेत. केळी आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात आणि शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. केळीमध्ये 100 कॅलरी उर्जा असते, ज्यामुळे तुमचे शरीर दिवसभर सफुर्तीवान राहते. याव्यतिरिक्त, त्यात असलेले इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे देखील शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. हिवाळ्याच्या दिवसांत केळी खाणे खूप महत्त्वाचे आहे.

हिवाळ्यात का खावी केळी?

केळ्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक आहे.

केळ्यामध्ये उच्च फायबर असते. म्हणून हिवाळ्यात केळी खाणे फायद्याचे आहे. केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि शरीर निरोगी राहते.

उच्च रक्तदाब नियंत्रित करेल.

केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. यामुळे तुमचे हृदयही मजबूत बनवते. केळ्यांसारख्या उच्च फायबरयुक्त पदार्थांना हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते (Health Benefits of Banana during winter season).

जीवनसत्त्वे आणि खनिज पदार्थांचे भांडार

हिवाळ्याच्या हंगामात हाडांशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या उदभवू लागतात. कॅल्शियमचा दररोजचा डोस केवळ हाडांची घनता टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरत नाही तर, त्यांना बळकटी देण्यासही फायदेशीर ठरू शकतो. केळीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅंगनीज, मॅग्नेशियम, लोह, फोलेट, नियासिन, राइबोफ्लेविन आणि बी 6 सारखी जीवनसत्त्वे असतात.

चांगली झोप येण्यास मदत होते.

बर्‍याच लोकांना झोपेची समस्या असते. कमी झोप लागल्यामुळे बरेच लोक अत्यंत अस्वस्थ असतात. अशा प्रकारच्या समस्येमध्ये केळी खूप फायदेशीर ठरू शकतात. केळी खाण्याने छान झोप लागते. पोटॅशियमयुक्त केळी थकलेल्या स्नायूंना आराम देण्यास मदत करतात. संध्याकाळी उशिरा एक किंवा दोन केळी खाल्ल्यास तुम्हाला रात्रभर चांगली झोप लागते.

(Health Benefits of Banana during winter season)

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)

हेही वाचा :

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें