गुलाबी थंडीत घरी बनवा आवळाप्राश, निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर

हिवाळ्यात आवळाप्राशनचे सेवन अधिक फायदेशीर मानले जाते. आयुर्वेदिक हर्बल मिश्रण शरीराला उबदार ठेवण्यास, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि सर्दी, खोकला, ताप यासारख्या हिवाळ्यातील सामान्य आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करते.

गुलाबी थंडीत घरी बनवा आवळाप्राश, निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 3:23 PM

हिवाळ्यात आपले आरोग्य निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी विविध गोष्टींचे सेवन करत असतो, त्यापैकी एक म्हणजे आवळाप्राश. हे आवळ्यापासून बनवलेले च्यवनप्राश आहे. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आवळाप्राश बनवण्यासाठी अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध नैसर्गिक गोष्टींचा वापर केला जातो, अशा वेळी त्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तसेच तुमचे शरीर उबदार ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते.

हल्ली बाजारात आपल्याला आवळाप्राश सहज मिळते. परंतु बाजारात मिळणारे आवळाप्राश,मध्ये अनेक प्रकारची भेसळ असण्याची शक्यता असते. अशा तऱ्हेने बाजारात मिळणारा आवळाप्राश शुद्ध आहे की नाही, असा प्रश्न लोकांच्या मनात येतो. अशावेळी तुम्ही बाजाराऐवजी घरीच आवळाप्राश बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी आवळा प्राशच्या सोप्या पद्धतीबद्दल सांगणार आहोत.

साहित्य

५०० ग्रॅम आवळा, ४ छोटी वेलची, १ मोठी वेलची, १० लवंगा, १ चक्र फुल, ५ तमालपत्रे, १ चमचा काळी मिरी, १ लहान दालचिनी, १/२ कप गरम पाण्यात भिजवलेले मनुके, १५ खजूर, बिया काढून गरम पाण्यात भिजवलेले, आल्याचा ४ तुकडे, १ कप तुळशीची पाने, ३ चमचे तूप, १ कप गूळ, १५-२० केशर धागे

आवळाप्राश कसे बनवावे

एका भांड्यात पाणी घेऊन १५ ते २० मिनिटे आवळा वाफवून घ्या . तसेच दालचिनी, वेलची, मोठी वेलची, लवंग, चक्र फुल, काळी मिरी, तमालपत्र मंद आचेवर भाजून घ्यावे. त्यानंतर भाजलेले हे सर्व प्रकार थंड करून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात बारीक करून बाजूला ठेवा. यानंतर मनुका, खजूर, आले आणि तुळशीची पाने थोड्या पाण्यात भिजवून थोड्या वेळाने मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावीत. आता पाण्यात वाफवलेले आवळे थंड झाल्यावर त्यातील आवळ्याचे बिया काढून टाका व त्यानंतर आवळ्याची बारीक पेस्ट तयार करावी.

आता एका कढईत तूप घाला. त्यानंतर आवळ्याची पेस्ट घालून ४-५ मिनिटे शिजवून घ्या नंतर गूळ घालून २ मिनिटे शिजवा. यानंतर यात तुम्ही तयार केली खजूर पेस्ट, बारीक वाटलेले मसाले आणि केशर घालून सर्व मिश्रण मिक्स करा. आता मंद आचेवर कोरडे होईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत शिजवा. त्यानंतर तयार झालेले आवळा प्राश केशरने सजवा. एअरटाइट कंटेनरमध्ये तुम्ही 3 ते 6 महिने हे ठेवू शकता. दररोज 1 चमचा गरम दुधाबरोबर आवळाप्राश खाऊन निरोगी आणि तंदुरुस्त राहा.

शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?
शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?.
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान.
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात.
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध.
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'.
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव.
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा.
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड.
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?.
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल.