AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Helmet Safety Tips : हेल्मेटलाही असते एक्सपायरी डेट ? किती वर्षांनी बदलावं ? क्लीनिंग टिप्सही घ्या जाणून

Helmet Expiry Date : टू-व्हीलर किंवा बाईक चालवताना हेल्मेट आवश्यक असतं. पण इतर गोष्टींप्रमाणेच हेल्मेचलाही एक्सपायरी डेट असते, हे तुम्हाला माहीत आहे का ? ते वेलेवर बदलणंही खूप गरजेचं असतं.

Helmet Safety Tips : हेल्मेटलाही असते एक्सपायरी डेट ? किती वर्षांनी बदलावं ? क्लीनिंग टिप्सही घ्या जाणून
हेल्मेटलाही असते एक्सपायरी डेट
| Updated on: May 02, 2026 | 3:10 PM
Share

आपण जेव्हा बाईक किंवा स्कूटर चालवतो, तेव्हा हेल्मेट हे आपले सर्वात महत्त्वाचे संरक्षण ठरतं. ते नेहमी वापरलं पाहिजे. पण बरीच वर्ष हेल्मेट वापरणाऱ्यांनाही कदाटित हे माहीत नसेल की हेल्मेलटलाही एक्स्पायरी डेट असते. ते कायम टिकत नाहीत. कालांतराने, हेल्मेटची ताकद कमी होते, ज्यामुळे अपघात झाल्यास पुरेसे संरक्षण मिळण्याची शक्यता कमी होते. म्हणून, हेल्मेट कधी बदलावे आणि त्याची योग्य काळजी कशी घ्यावी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. चला, आज आपण याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.

हेल्मेटचं किती असतं वय ?

खरं तर, एक चांगलं हेल्मेट साधारणपणे 3 ते 5 वर्षांसाठी सुरक्षित मानलं जातं. हेल्मेटच्या आत असलेला फोम किंवा आवरण डोक्याला आघातांपासून वाचवतो, पण कालांतराने घाम, धूळ आणि आर्द्रतेमुळे हे आवरण कमकुवत होतं. बाहेरून जरी हेल्मेट ठीक दिसत असलं तरी, त्याची अंतर्गत मजबुती कमी झालेली असते. हेल्मेट जीर्ण झाल्यास, अपघाताच्या वेळी ते योग्यरित्या काम करणार नाही आणि डोक्याला नीट संरक्षण देऊ शकणार नाही. त्यामुळे, मुदत संपल्यावर हेल्मेट बदलणं महत्त्वाचं आहे. तुमचे हेल्मेट कधी पडलं असेल तर किंवा त्याला अगदी किरकोळ धक्का लागला असला तरी ते ताबडतोब बदललं पाहिजे. कधीकधी, हेल्मेटच्या आतील अस्तराला तडे जातात, जे दिसत नाहीत पण त्यामुळे धोका वाढतो.

हेल्मेट साफ करण्याची योग्य पद्धत

हेल्मेट स्वच्छ ठेवणे हे केवळ दिखाव्यासाठी नाही, तर तुमच्या आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहे. दीर्घकाळ वापरल्यामुळे हेल्मेटमध्ये घाम आणि धूळ साचू शकते, ज्यामुळे दुर्गंधी आणि जीवाणूंची वाढ होतं. जर हेल्मेटचे आतील पॅडिंग काढता येत असेल, तर ते काढून कोमट पाण्याने आणि सौम्य शाम्पूने धुवावे. हेल्मेट हे मशीनमध्ये धुवायचं नसतं, कारण त्यामुळे त्याचा आकार बिघडू शकतो. हेल्मेटची काच साफ करताना जाडसर कापड वापरणं टाळा, कारण त्यामुळे त्यावर ओरखडे येऊ शकतात. नीट दिसावं, यासाठी नेहमी मऊ कापड आणि स्वच्छ पाण्याचा वापर करा.

सूर्यप्रकाश आणि योग्य देखभाल

बरेच लोक त्यांचं हेल्मेट हे उन्हात वाळवतात, जे ठीक आहे, पण ते काही काळासाठीच योग्य असतं. सौम्य सूर्यप्रकाशामुळे जीवाणू नष्ट होण्यास मदत होते, पण हेल्मेट जर खूप वेल कडक उन्हात राहिलं तर त्य़ाच्या बाहेरच्या भागाचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे, हेल्मेट जास्त वेळ उन्हात ठेवणं टाळा.

नवं हेल्मेट खरेदी करताना काय काळजी घ्यावी ?

नवीन हेल्मेट खरेदी करताना, नेहमी ISI मार्क असलेलेच निवडा. यामुळे सुरक्षिततेची हमी मिळते. स्वस्त आणि ब्रँड नसलेली हेल्मेट्स टाळावीत, कारण अपघात झाल्यास अशी हेल्मेट्स पुरेसे संरक्षण देऊ शकत नाहीत. एक चांगलं हेल्मेट तुमचा जीव वाचवू शकतं. त्यामुळे अमनोल जीवनसाठी चांगलं हेल्मेटचं निवडा, उगाच पैसे वाचवायला गेलात तर नंतर पश्चाताप करावा लागू शकतो.

Follow Us
दराडे आणि गीतेंमध्ये शाब्दिक चकमक; शिवीगाळ झाल्याचीही माहिती समोर
Nashik Gite Vs Darade Rada | दराडे आणि गीतेंमध्ये शाब्दिक चकमक; शिवीगाळ झाल्याचीही माहिती समोर, नेमकं काय घडलं?
ओमराजेंच्या मनधरणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान; कैलास पाटलांसह वरुण
ओमराजेंच्या मनधरणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान; कैलास पाटलांसह वरुण सरदेसाई, 15 कोटी अन् बरंच काही...
नागपुरात भाजपचा झेंडा फडकला; राजीव पोतदार विजयी, काँग्रेसला मोठा धक्का
Nagpur Vidhan Parishad Result | नागपुरात भाजपचा झेंडा फडकला; राजीव पोतदार विजयी, काँग्रेसला मोठा धक्का
अखेर तेच घडलं! नाशिकमध्ये महायुतीतील नेत्यांमध्ये बिनसलं; नरेंद्र दराड
अखेर तेच घडलं! नाशिकमध्ये महायुतीतील नेत्यांमध्ये बिनसलं; नरेंद्र दराडे म्हणाले, शिंदेच...
नाशिकमध्ये राजकीय भूकंप! अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा मोठा विजय
Nashik Gokul Gite | नाशिकमध्ये राजकीय भूकंप! अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा मोठा विजय, महायुतीला धक्का
अखेर ठरलं! ओमराजे निंबाळकरांचा ठाकरे गटाला रामराम, शिंदे गटात...
tv9 Marathi Special Report | अखेर ठरलं! ओमराजे निंबाळकरांचा ठाकरे गटाला रामराम, शिंदे गटात प्रवेश निश्चित
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात!
Nagpur Vidhan Parishad | विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात!; महायुतीचे वर्चस्व कायम राहणार की उलटफेर होणार?
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग