Herbal Tea Benefits | हिवाळ्याच्या दिवसांत चहा-कॉफीऐवजी प्या ‘हर्बल टी’, आजारांचा धोका होईल कमी!

चहा किंवा कॉफीचे अधिक प्रमाणात सेवन आपल्या आरोग्यास हानिकारक ठरते.

Herbal Tea Benefits | हिवाळ्याच्या दिवसांत चहा-कॉफीऐवजी प्या ‘हर्बल टी’, आजारांचा धोका होईल कमी!
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 12:11 PM

मुंबई : आपण सर्वजण आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीचा गरमागरम घोट घेऊन करतो. आपल्या जीवनशैलीचा खाण्यापिण्याच्या सवयींवरही मोठा परिणाम होतो. अशा परिस्थितीत चहा किंवा कॉफीचे अधिक प्रमाणात सेवन आपल्या आरोग्यास हानिकारक ठरते. त्यामुळे चहा किंवा कॉफीऐवजी आपण ‘हर्बल टी’ पिऊ शकता. ‘हर्बल टी’ने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तसेच, ‘हर्बल टी’ आपल्या पचन तंत्रासाठीदेखील चांगला आहे. दररोज ‘हर्बल टी’चे नियमित सेवन केल्याने तुमचे वजनही कमी होते (Herbal Tea Benefits during winter season).

याशिवाय ‘हर्बल टी’ सर्दी, पडसे, खोकला यासारख्या आजारांपासून शरीराचे संरक्षण करते. बर्‍याच ठिकाणी लोकांकडून ‘हर्बल टी’चा वापर काही आजार बरे करण्यासाठी केला जातो. चला तर, आरोग्यवर्धक असणाऱ्या ‘हर्बल टी’ पिण्याच्या जबरदस्त फायद्यांविषयी जाणून घेऊया…

मानसिक शांततेसाठी ‘कॅमोमाइल टी’

बर्‍याच संशोधनांमध्ये असे आढळले आहे की, कॅमोमाइल चहा पिण्यामुळे ताणतणाव कमी होतो. हे अँटी-डिप्रेसन्ट प्रमाणे काम करते. कॅमोमाइल टीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे आपल्या स्लीपिंग पॅटर्नला सुधारण्यास मदत करतात. तसेच, दररोज ‘कॅमोमाइल टी’चे सेवन केल्याने शरीरातील साखर नियंत्रणात राहते.

आल्याचा चहा

हिवाळ्याच्या हंगामात आपल्यापैकी बहुतेक लोकांच्या घरात आल्याचा चहा बनवला जातो. आल्याचा चहाचा उपयोग डोकेदुखी, सर्दी, खोकला, पाचन समस्या दूर करण्यासाठी केला जातो. आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. तसेच, आले गर्भवती महिला आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठीही खूप फायदेशीर आहे. आल्याचा मसाला म्हणून वापरला जातो (Herbal Tea Benefits during winter season).

पुदीना चहा

पुदीनाच्या वापर पाचन तंत्र मजबूत करण्यासाठी केला जातो. पुदीनायुक्त चहा बद्धकोष्ठता, अपचन, पोटदुखीच्या समस्या दूर करण्यासाठी देखील प्यायला जातो. पुदीन्यामध्ये पेपरमिंटचे औषधी गुणधर्म आहेत, जे आपल्या पोटाला आतून थंड ठेवतात. हा चहा दररोज पिल्याने अॅसिडीटीची समस्या दूर होतो.

उपाशी पोटी चहा पिण्याने नुकसान!

काम करणारे लोक चहाचे सर्वाधिक सेवन करतात. कारण, चहामधील कॅफिनचे प्रमाण तुम्हाला सक्रिय ठेवण्यास मदत करते. पण, जास्त चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्याहीपेक्षाही रिकाम्या पोटी चहा पिणे अधिक हानिकारक आहे. सकाळी उठल्याबरोबर बर्‍याच लोकांना चहाची तलफ येते. जर, चहा मिळाला नाही, तर लोकांचे डोके दुखू लागते. म्हणून, नुसता चहा पिण्याऐवजी, चहाबरोबर थोडा हलका फुलका नाश्ता देखील करावा, असा सल्ला नेहमी दिला जातो. केवळ चहा न पिता, त्यासोबत काही खाल्ल्यास शरीराला इजा होत नाही. चहा पिण्यामुळे चपळता येते, असे म्हटले जाते. परंतु, सकाळी दूधयुक्त चहा प्यायल्याने दिवसभर थकवा येतो आणि कामात चिडचिड होऊ लागते. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने हृदयाची गती वाढते. ज्यामुळे हृदयविकाराची समस्य निर्माण होण्याची शक्यता असते.

(Herbal Tea Benefits during winter season)

(टीप : सेवनापुर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.