दुधाच्या चहापेक्षा ‘ग्रीन टी’ला मिळतेय सर्वाधिक पसंती! वाचा या ‘ग्रीन टी’चा रंजक इतिहास…

| Updated on: Jan 26, 2021 | 4:47 PM

‘ग्रीन टी’ त्याच्या अँटी ऑक्सिडंट गुणधर्मांमुळे मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय कुटुंबांचे आवडते पेय बनले आहे.

दुधाच्या चहापेक्षा ‘ग्रीन टी’ला मिळतेय सर्वाधिक पसंती! वाचा या ‘ग्रीन टी’चा रंजक इतिहास...
ग्रीन टी
Follow us on

मुंबई : आजकाल ‘ग्रीन टी’चा ट्रेंड प्रचंड वेगाने वाढत आहे. ‘ग्रीन टी’ त्याच्या अँटी ऑक्सिडंट गुणधर्मांमुळे मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय कुटुंबांचे आवडते पेय बनले आहे. अनेकांनी दुधाच्या चहाऐवजी ‘ग्रीन टी’ला पसंती दिली आहे. सर्वसामान्यांची आवडती बनलेली ही ‘ग्रीन टी’ भारतात नेमकी कधी आहे? आणि तिचा वापर कसा सुरू झाला? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तसा या चहाचा विदेश प्रवासही फार रंजक आहे (History of Green Tea).

‘ग्रीन टी’ची उत्पत्ती चीनमध्ये झाली, असे म्हटले जाते. ग्रीन टी हा एक प्रकारचा सेंद्रीय चहा आहे जो चीनच्या फुझियान प्रांतातील डोंगराळ भागात पिकतो. याबद्दल अशीही एक कथा सांगितली जाते की, एके दिवशी काही सुकलेली पाने सम्राट शाननुंगसमोर ठेवलेल्या गरम पाण्याच्या कपात येऊन पडली. त्यामुळे पाण्याचा रंग बदलला. यानंतर जेव्हा सम्राटाने हे पाणी सेवन केले, तेव्हा त्याला त्याची चव आवडली. तेव्हापासून त्याने ते पाणी ‘पेय’ म्हणून पिण्यास सुरुवात केली. ही कथा ख्रिस्तपूर्व 2737 वर्षांपूर्वीची आहे. यानंतर चीनमध्ये ‘ग्रीन टी’ची प्रथा सुरू झाली. आरोग्याशी संबंधित सर्व फायद्यांमुळे, हळूहळू हे पेय जगभरात प्रसिद्ध झाले.

कसा तयार होतो ‘ग्रीन टी’?

चहाचा प्रकार कोणताही असो, तो कॅमेलिया सायनेन्सिस नावाच्या झाडाच्या पानांपासून बनवला जातो. ही झाडे संपूर्ण आशिया तसेच मध्य पूर्व आणि आफ्रिकेच्या काही भागात वाढतात. या झाडांच्या अनफरमेन्टेड पानांपासून चहा बनवली जाते. चहाची पानांना प्रथम हाताच्या व नंतर मशीनच्या प्रक्रियेतून जावे लागते. यावेळी त्यातील आवश्यक एंजाइम काढून टाकले जातात. त्यानंतर ही पाने कोरडी व्हावीत म्हणून ऑक्सिडेशनसाठी ठेवले जातात. पानांचे ऑक्सिडेशन जितके जास्त, तितकी  ‘ग्रीन टी’ चविष्ट बनते (History of Green Tea).

झोप येऊ नये म्हणून बौद्ध भिक्षू चहाची पानं चावायचे

बौद्ध भिक्षू जेन जे नंतर बौद्ध धर्माचे संस्थापक झाले. त्यांनी जीवनाचं रहस्य जाणून घेण्यासाठी सात वर्षांसाठी निद्रा त्याग केला होता. जेव्हा ते पाचव्या वर्षात होते तेव्हा त्यांनी बुशची पानं चावायला सुरुवात केली. या पानांच्या आधारे ते जिवंत होते आणि ही पानं चावल्यानंतर त्यांना झोप यायची नाही. ही पानं जंगली चहाची पानं होती. त्यानंतर या पानांना इतर लोकही चावू लागले.

ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने उत्पादनाची सुरुवात केली

16 व्या दशकापर्यंत लोकांनी चहाच्या पानांचा वापर भाजीच्या रुपात केला. तसेच, याला वाटून ते काळं पेय बनवून त्याचं सेवन करायचे. पण, 19 व्या शतकात भारतात याचं उत्पादन ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने सुरु केलं. त्यासोबतच, ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने आसाममध्ये पहिली चहाची बागही सुरु करण्यात आली. त्यानंतर चहाचं चलन वाढलं. आज देशातील अनेक भागांमध्ये चहाची शेती केली जाते.

(History of Green Tea)

हेही वाचा :