केसगळती थांबवण्यासाठी रामबाण उपाय, रोज या 5 बियांचे करा सेवन

बदलत्या जीवनाचा परिणाम हा आता केसांवरही होऊ लागला आहे. अनेकांना केस गळतीची समस्या जाणून लागली आहे. यावरील काही उपायांबाबत आपण माहिती जाणून घेऊयात.

केसगळती थांबवण्यासाठी रामबाण उपाय, रोज या 5 बियांचे करा सेवन
hair
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Mar 25, 2026 | 11:36 AM

आजकाल केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रदूषण, अनहेल्दी पदार्थांचे सेवन आणि तणाव यांचा केसांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे केस गळण्याच्या समस्या सतावू लागते. परिणामी आपल्यापैकी अनेकजण केस गळती रोखण्यासाठी महागड्या केमिकल उत्पादनांचा केसांवर वापर करतात. मात्र हे उपाय दीर्घकाळ चांगले परिणाम देत नाही. विज्ञान आणि आयुर्वेदानुसार शरीरातील अंतर्गत पोषण जितके चांगले असेल, तितके केस अधिक निरोगी आणि मजबूत होतात. त्यामुळे योग्य पोषक तत्वे केसांच्या मुळांपर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

यासाठी तुम्ही रोज या काही बियांचे सेवन करा जे तुमच्या केसांसाठी फायदेशीर ठरू शकतात. या बियांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि आरोग्यदायी फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. चला तर मग आजच्या लेखात आपण केसांसाठी फायदेशीर असलेल्या बियांबद्दल जाणून घेऊयात.

अळशीच्या बिया: अळशीमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते, जे केसांच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट मानले जाते. त्यामुळे तुम्ही नियमित अळशीच्या बिया भाजून त्यांचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने केसांना मजबूती मिळते. तसेच केस ओलसर आणि चमकदार दिसतात. त्यासोबतच स्कॅल्प निरोगी ठेवते आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. अळशीचे सेवन केल्याने किंवा अळशी पाण्यात उकळवून जेव्हा ते पाणी जेल स्वरूपात तयार होते तेव्हा केसांवर जेल म्हणून वापरल्याने सकारात्मक परिणाम मिळू शकतो.

मेथीचे दाणे: आयुर्वेदात मेथीचे दाणे केसांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. त्यामध्ये असलेले प्रोटीन आणि निकोटिनिक ॲसिड केसांची मुळे मजबूत करतात आणि केस गळणे थांबवतात. तसेच स्कॅल्पचे पोषण करतात आणि कोरडेपणा टाळतात. मेथीच्या दाण्याचा केसांसाठी वापर करण्यासाठी, मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवा, सकाळी ते वाटून घ्या, त्याची पेस्ट बनवा आणि केसांच्या मुळांना लावा. काही वेळाने केस स्वच्छ धुवून घ्या.

सूर्यफुलाच्या बिया: सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतात, जे स्कॅल्पमधील रक्तसंचार सुधारून केसांच्या वाढीस चालना देतात. त्यामधील अँटीऑक्सिडंट्स केसांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. स्कॅल्पला आराम देण्यासाठी त्यांचा लेप म्हणून वापर केला जाऊ शकतो.

भोपळ्याच्या बिया: भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक आणि लोह भरपूर प्रमाणात असते. झिंक केसांची दुरुस्ती करते, तर लोह केसांच्या मुळांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करते. तसेच या बियांपासून तयार केलेले तेल शरीरातील पोषक तत्वांची कमतरता दूर करून केसांची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. याच्या नियमित वापरामुळे केस गळणे कमी होण्यास आणि केसांच्या वाढीस चालना मिळण्यास मदत होऊ शकते. तुम्ही भोपळ्याच्या बियांचे तेल थोडे गरम करून केसांच्या मुळांना लावू शकता. त्यासोबत रोज योग्य प्रमाणात बियांचे सेवन देखील केसांसाठी फायदेशीर ठरू शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us