टीव्ही किती अंतरावरून पाहणं योग्य ? नक्की वाचा..

लेखात टीव्ही पाहण्याचे योग्य अंतर आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम स्पष्ट केले आहेत. विभिन्न स्क्रीन आकारांसाठी योग्य अंतर, मुलांसाठी टीव्ही पाहण्याच्या वेळेचे नियोजन आणि टीव्ही पाहताना घ्याव्याची काळजी या विषयांवर चर्चा केली आहे. लेखात टीव्हीच्या उंची, प्रकाशमानता आणि घराच्या आकाराचा विचार करण्याचा सल्ला देखील दिला आहे.

टीव्ही किती अंतरावरून पाहणं योग्य ? नक्की वाचा..
टीव्ही किती अंतरावरून पहावा?Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 3:20 PM

ज्या घरात टीव्ही नाही असं एकही घर शोधून सापडणार नाही. प्रत्येक घरात टीव्ही असतोच असतो. आणि घरातील प्रत्येकजण टीव्हीसमोर तास न् तास बसून सिनेमा, मालिका पाहत असतात. हल्ली तर टीव्हीवर युट्यूब, नेटफिलिक्स, अमेझॉनही पाहता येतं. त्यामुळे टीव्हीचा घरातील वापर अधिक वाढला आहे. नाश्ता करताना असो वा जेवताना असो किंवा झोपताना असो टीव्ही पाहिला जातो म्हणजे जातोच. पण टीव्ही किती अंतरावरून पाहिला पाहिजे हे तुम्हाला माहीत आहे का? टीव्ही पाहण्याचंही एक शास्त्र आहे. त्याचं एक ठराविक अंतर आहे. त्या अंतरावरून टीव्ही नाही पाहिला तर त्याचे दुष्परिणाम होतात. त्यामुळेच टीव्ही नेमका किती अंतरावरून पाहिला पाहिजे, याचीच आपण चर्चा करणार आहोत.

टीव्हीच्या आकारानुसार योग्य अंतर :

28 इंच स्क्रीन असलेल्या टीव्हीसाठी, 3 फूट अंतरावर बसणे योग्य आहे.

32 इंच स्क्रीन असल्यास, 4 फूट अंतर ठेवा.

43 इंच स्क्रीन असलेल्या टीव्हीसाठी, 4 ते 6 फूट अंतर योग्य.

50 ते 65 इंच स्क्रीन असल्यास, कमीत कमी 5 ते 8 फूट अंतर राखा.

65 ते 75 इंच स्क्रीन असलेल्या टीव्हीसाठी, 6 ते 10 फूट अंतर राखणे आवश्यक आहे.

75 इंच आणि त्याहून मोठ्या स्क्रीन असलेल्या टीव्ही साठी, कमीत कमी 10 ते 12 फूट अंतर ठेवले पाहिजे.

काही आणखी सल्ले :

टीव्ही पाहताना वेळोवेळी विश्रांती घ्या. 20 मिनिटे एकसारखे टीव्ही पाहिल्यानंतर 5 ते 10 मिनिटांची विश्रांती घ्या, यामुळे डोळ्यांना आराम मिळेल.

मुलांसाठी टीव्हीच्या वेळा :

मुलांना एकाच वेळी 2 तासांपेक्षा जास्त टीव्ही पाहू देऊ नका.

टीव्हीचे रिझोल्यूशन :

उच्च रिझोल्यूशन असलेला टीव्ही पाहण्यासाठी, 4 ते 8 फूट अंतर ठेवा.

टीव्हीच्या उंचीवर लक्ष द्या :

टीव्ही पाहताना मानेला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. जास्त वर मान करून टीव्ही पाहू नका.

गडद अंधाऱ्या खोलीत टीव्ही पाहणे टाळा :

अंधाऱ्या वातावरणात टीव्ही पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येऊ शकतो. तसेच, अंधाऱ्या खोलीत टीव्ही पाहताना डोळ्यांचे पापणी कमी पडते, ज्यामुळे शुष्क डोळे होऊ शकतात.

घराचा आकार आणि टीव्हीचा आकार :

टीव्ही खरेदी करण्यापूर्वी, आपल्या घराचा आकार आणि जागेचा विचार करा. लहान खोल्या असलेल्या घरात मोठ्या स्क्रीन असलेला टीव्ही ठेवल्यास, डोळ्यांना आणि मानावर ताण येऊ शकतो, ज्यामुळे लवकरच वेदना होऊ शकतात.

राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले
राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले.
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?.
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?.
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी.
'तिघांना शुभेच्छा पण आता नाटकबाजी बंद..', शपथविधी होताच जरांगे पेटले
'तिघांना शुभेच्छा पण आता नाटकबाजी बंद..', शपथविधी होताच जरांगे पेटले.
'शपथविधीला निमंत्रण दिल पण..', 'त्यांच्या' अनुपस्थितीवर फडणवीस म्हणाले
'शपथविधीला निमंत्रण दिल पण..', 'त्यांच्या' अनुपस्थितीवर फडणवीस म्हणाले.
महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ
महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ.
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?.
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?.
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'.