तुमच्या चेहऱ्याच्या आकारावरून कोणता हेअरकट तुम्हाला सुट करेल, जाणून घ्या
तुम्ही जेव्हा नवीन हेअरकट करता तेव्हा तुमचा लूक पूर्णपणे चेंज होतो. पण जर तुम्ही चुकीचे हेअरकट केलात तर ते तुमचा लूक खराब करू शकतात. अशातच तुम्हाला जर कोणता हेअरकट तुम्हाला करावा हे समजत नाही तर तुम्ही , तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार हेअरकट करावा. चला तर मग आजच्या या लेखात आपण चेहऱ्याच्या आकारानुसार कोणता हेअरकट करावा हे जाणून घेऊयात...

फॅशनच्या या जगात प्रत्येकांची जीवनशैली बदलत चालेली आहे. यात अनेक महिला या त्यांच्या लूक चेंज करण्यासाठी पार्लरमध्ये जातात. त्यातच अनेक महिला त्यांचे लूक बदलण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे हेअरकट करतात. फक्त हेअरकट केल्याने चेहऱ्याचा संपूर्ण लूक बदलतो. मात्र काही महिला अनेकदा हेअरकट करताना एक चूक करतात, ती म्हणजे चुकीच्या पद्धतीने हेअरकट करणे. पार्लरमध्ये जाऊन चेहऱ्याच्या आकारानुसार हेअरकट केला नाहीतर तुमचा लूक देखील खराब होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार कोणता हेअरकट तुमच्यावर चांगला दिसेल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
प्रत्येकाच्या चेहऱ्याचा आकार वेगळा असतो. काही लोकांचे चेहरे गोल असतात, काहींचे अंडाकृती असतात तर काहींचे चौकोनी असतात. अशावेळेस जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार म्हणजेच फेसशेप हेअरकट केलात तर तुमचा लूक आकर्षक दिसतो. तर आजच्या या लेखात आपण तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार तुम्हाला कोणता हेअरकट करावा ज्यामुळे तुमचा लूक पूर्णपणे बदलेल आणि तुम्ही स्मार्ट दिसाल ते जाणून घेऊयात.
गोल चेहरा असलेल्यांसाठी हेअरकट
गोल चेहरा असलेल्या महिलांनी खूप लहान किंवा हनुवटीच्या लांबीचा बॉब कट करू नये. जर तुमचा चेहरा गोल असेल तर तुम्ही लेयर्ड कट, लाँग लेयर्ड आणि साइड बँग असलेले हेअरकट करावे. हे गोल चेहऱ्यावर उठून दिसतात आणि खूप छान लूक देतात. हे हेअरकट चेहरा लांब आणि सडपातळ दिसण्यास मदत करतात.
अंडाकृती चेहरे असलेल्यांसाठी हेअरकट
ज्या महिलांचा चेहऱ्याचा आकार हा अंडाकृती आहे, त्यांच्यासाठी जवळजवळ कोणतेही हेअरकट सुट होतात. त्यामुळे ते कोणतेही हेअरकट ट्राय करू शकतात, जसे की लाँग वेव्हज, पिक्सी कट, बॉब कट किंवा स्टेप कट. हा एक परिपूर्ण चेहऱ्याचा आकार मानला जातो.
चौकोनी चेहऱ्याच्या आकारासाठी हेअरकट
आपल्यापैकी अनेकांचा चेहऱ्याचा आकार हा चौकोनी आहे त्यांनी बॅंग्स किंवा जबड्याच्या लांबीचे हेअरकट करू नये. त्याऐवजी, तुम्ही सॉफ्ट लेयर्स, साइड-स्वीप्ट बँग्स किंवा लांब कर्ल असे हेअरकट करू शकता. कारण असे हेअरकट चेहऱ्याचा विस्तृत भाग झाकते आणि चेहरा लहान दिसतो.
हृदयासारखा आकार असलेल्या चेहऱ्यासाठी हेअरकट
ज्या महिलांच्या चेहऱ्याचा आकार हा हृदयासारखा आहे, त्यांनी हनुवटीच्या लांबीचा बॉब, साइड पार्टिंग किंवा फेदर कट त्यांना योग्य वाटतो. हे कपाळाची रुंदी कमी करते आणि आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही लेयर कट करू नये, यामुळे तुमचा लुक खराब होऊ शकतो.
चेहऱ्यांचा आकार लांब असणे
ज्या महिलांचे चेहरे लांब आहेत त्यांनी फ्रिंज, साइड स्वीप्ट बॅंग आणि लेयर्ससह व्हॉल्यूम असलेले हेअरकट करावे. कारण या कटमुळे त्यांचा चेहरा लहान आणि बॅलेंस दिसतो, ज्यामुळे त्यांना एक स्मार्ट लूक मिळतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
