उन्हाळ्यात शरीराला डिटॉक्स करण्यासाठी प्या ‘हे’ खास पेय

चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे आपल्या शरीरात हळूहळू घाण जमा होऊ लागते. पण जर त्यावर वेळीच उपचार केले नाहीत तर या घाणीमुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तसेच अनेक संसर्ग आणि आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशा डिटॉक्स ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत जे उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून तुमचे रक्षण करतील. चला तर मग जाणून घेऊयात...

उन्हाळ्यात शरीराला डिटॉक्स करण्यासाठी प्या हे खास पेय
डिटॉक्स ड्रिंक्स
| Edited By: | Updated on: Apr 25, 2025 | 3:49 PM

वाढत्या उन्हाळ्याच्या तडाख्यात आपल्याला सतत तहान लागत राहते. त्यामुळे आपण थंड पेये आणि साखरयुक्त पेये पित असतो. पण हे पिणे टाळले पाहिजे कारण ते आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतात. अनेक संशोधनांमध्ये असे म्हटले आहे की अशा पेयांचे सेवन टाळावे कारण त्याचा पचनावर, खराब कोलेस्ट्रॉलवर आणि त्वचेवरही वाईट परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला कोल्ड्रिंक्स प्यायचे असतील तर घरी डिटॉक्स ड्रिंक्स बनवा. जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

डिटॉक्स ड्रिंक्स प्यायल्याने एकूण आरोग्याला फायदा होतो. तर हे डिटॉक्स ड्रिंक्स बनवण्यासाठी सर्वप्रथम काकडी-पुदिना, दालचिनी, आले, पुदिन्याची पाने, फळ घ्या. तर डिटॉक्स ड्रिंक्स यामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या आहेत. या सर्व गोष्टींचे कोणतेही दुष्परिणाम आरोग्याला होणार नाहीत.

शरीराला डिटॉक्स करण्यासाठी हे हेल्दी ड्रिंक अशा प्रकारे बनवा

पुदिना आणि काकडीने बनवलेले डिटॉक्स पेय

उन्हाळ्यात जास्त काळ स्वतःला हायड्रेटेड आणि फ्रेश ठेवण्यासाठी, पुदिना आणि काकडी घालून हे डिटॉक्स ड्रिंक बनवा. यासाठी प्रथम एक ग्लास पाणी घ्या आणि त्यात काही पुदिन्याची पाने टाका. तसेच काकडीचे काही बारीक तुकडे करा आणि त्यात घाला. या सर्वांव्यतिरिक्त, त्यात काळे मीठ, लिंबू आणि थोडे मध मिक्स करा. त्यानंतर सर्व गोष्टी एकत्र मिसळून थोडावेळ हे पाणी तसेच ठेवा. त्यानंतर हे डिटॉक्स डिंक्स पिण्यास तयार आहे. पुदिना आणि काकडीच्या पाण्याने तुम्ही नैसर्गिकरित्या विषारी पदार्थ काढून टाकू शकता. हे पाणी प्यायल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जावान वाटते.

सफरचंद सायडर व्हिनेगर आणि दालचिनी

तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्यासाठी दालचिनी पावडरमध्ये ॲपल सायडर व्हिनेगर मिसळून एक निरोगी पेय बनवा. त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल घटक शरीराला आतून डिटॉक्स करण्याचा प्रयत्न करतात. हे पेय बनवण्यासाठी, फक्त एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यात एक चमचा ॲपल सायडर व्हिनेगर मिक्स करा आणि नंतर एक चिमूटभर दालचिनी पावडर टाका आणि ते दररोज रिकाम्या पोटी प्या.

नारळ पाणी आणि पुदिना

नारळाच्या पाण्यात पुदिना घालून तुम्ही डिटॉक्स ड्रिंक देखील बनवू शकता. यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला काही पुदिन्याची पाने घ्यायची आहेत आणि ती काही वेळ नारळाच्या पाण्यात ठेवावी लागतील. चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात लिंबाचा रस देखील मिक्स करू शकता. हे पेय तुमच्या शरीराला आतून डिटॉक्स करण्यास मदत करते. शिवाय, ते शरीराला बराच काळ हायड्रेट ठेवते. नारळाच्या पाण्यात असलेले इलेक्ट्रोलाइट शरीराला सक्रिय आणि ऊर्जावान ठेवते. जेणेकरून तुमच्या शरीरात साचलेली घाण आतून स्वच्छ होईल. म्हणून या उन्हाळ्यात वरील डिटॉक्स पेये तुमच्या आहारात समाविष्ट करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)